मुंबई (विशेष प्रतिनिधी सिद्धार्थ जाधव) – होमगार्ड संघर्ष समितीमार्फत काल (दि.११) गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जनता दरबारामध्ये होमगार्डच्या प्रलंबित मागण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले. कोरोना सुरु होण्याअगोदर जानेवारी महिन्यामध्ये होमगार्ड महासमादेशक संजय पांडे यांच्या विरोधात अनेक तक्रारी दिल्या होत्या परंतु त्या निष्काळजी संजय पांडे यांच्यावरती कोणतीच कारवाई झालेली नव्हती त्या अनुषंगाने संपूर्ण 34 जिल्ह्याच्या माध्यमातून असंख्य तक्रारी संजय पांडे यांच्याविरोधात असून, कमीत कमी 40 ते 50 तक्रारी प्रलंबित आहेत.
त्या अनुषंगाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जनता दरबारामध्ये होमगार्ड महासमादेशक संजय पांडे यांचे प्रथम निलंबित करण्यात यावे ही मागणी केली. कारण त्यांनी आजपर्यंत होमगार्डसाठी कोणतेही चांगले निर्णय घेतलेले नाहीत. तेव्हा अशा बेजबाबदार अधिकाऱ्याचे निलंबन होणे गरजेचे आहे. होमगार्ड संघटनेची वाट लावणारा मुख्य सूत्रधार हा संजय पांडे असल्याचे यावेळी प्रखरपणे मांडण्यात आले.
त्याचदरम्यान होमगार्ड संघर्ष समितीकडून जनता दरबारामध्ये होमगार्डांना 365 दिवस बंदोबस्त मिळणे, कोणती पूर्वसुचना न देता मनमानीप्रमाने 34 जिल्ह्यातील अपात्र केलेला होमगार्डना पात्र करून घेणे, महासमादेशक मुंबई कार्यालयामार्फत 34 जिल्ह्यांमध्ये 300 कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे त्याची सीबीआय अँटिकरप्शन मार्फत चौकशी करणे, ठाणे जिल्ह्यातील बोगस जिल्हा समादेशक डॉक्टर विवेक सोनी यांच्या वरती फौजदारी ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करणे, वसई पथकातील मिरा भाईंदर येथील 12 होमगार्ड अधिकारी व कर्मचारी यांच्यावरती जे खोटे गुन्हे दाखल केले आहे ते मागे घेणे व सदर पथकातील अधिकारी कर्मचारी यांना सन्मानाने होमगार्डमध्ये परत घेणे हे असे आदेश ठाणे जिल्हा समादेशक अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांना देण्यात यावे आणि ज्या बोगस जिल्हा समादेशक डॉक्टर विवेक सोनी यांनी खोटे गुन्हे दाखल केले त्या डॉक्टर विवेक सोनी वरती फौजदारी व फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावे, 2019मधील ठाणे जिल्ह्यातील प्रतीक्षा यादीतील 600 मुला-मुलींना तात्काळ होमगार्ड भरती मध्ये सामावून घेणे, पालकमंत्री ठाणे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी महिन्यामध्ये बैठकीचे आयोजन करण्याचे निर्देश दिले होते त्या बैठकीचे नियोजन मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होमगार्डच्या न्याय हक्कासाठी बैठक आयोजित करणे, होमगार्ड संघटनेची जी पदे बरखास्त केली आहे ती पदे पूर्ण स्थापित करणे, ठाणे जिल्ह्यातील बोगस जिल्हा समादेशक डॉक्टर विवेक सोनी यांच्या कालखंडामध्ये अगोदर आणि नंतर जी बोगस भरती झाली आहे त्या बोगस भरती मधील वेतनी अधिकारी व कर्मचारी यांच्या वरती फौजदारी व फसवणुकीचे गुन्हे दाखल करणे, ठाणे जिल्ह्यातील सिद्धार्थ जाधव यांच्या गृह विभागात अपील केलेल्या निलंबनाबद्दल गृहविभागाने 3 वेळा रिमाइंडर, स्मरणपत्र होमगार्ड महासमादेशक यांना पाठवूनसुद्धा आजपर्यंत महासमादेशक संजय पांडे यांनी पदाचा गैरवापर करून संपूर्ण अहवाल पाठवलेला नाही अशा आयपीएस संजय पांडे होमगार्ड महासमादेशक यांच्यावरसुद्धा ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मानसेवी होमगार्ड यांना पोलिसांप्रमाणे वेतन भत्ते देण्याचे निर्देश देण्यात यावे आदी प्रलंबित मागण्या मांडण्यात आल्या.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सकारात्मक विचार करून तात्काळ कारवाईचे आदेश दिले असून, या सर्व सहकार्यांमध्ये संभाजी ब्रिगेडचे आमदार अमोलदादा मिटकरी यांनी होमगार्डवर होणाऱ्या अन्यायाविरोधात होमगार्ड संघर्ष समितीला पाठिंबा दर्शविला आहे. जनता दरबारामध्ये होमगार्डची बाजू मांडताना गृहमंत्री अनिल देशमुख यांना पोलिस बॉईज असोसिएशन तथा गृहरक्षक दल होमगार्ड संघर्ष समिती मार्फत कोरोना योद्धाने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.