महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका सीमा पाटील यांनी सर्व देव बुडवले अरबी समुद्रात…….

seema-patil

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका सीमा पाटील या बहुजन गुरव समाजातील आहेत त्यांनी दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरातील सर्व देव बुडवले अरबी समुद्रात आणि त्या झाल्या ब्राम्हणी धर्मा पासून मुक्त. त्यांनी घेतला मुक्तीचा श्वास.

 

 

बहुजन समाजातील गुरव समाज हा देवळातील साफसफाई, दिवा बत्ती करणारा समाज त्या कामाचा त्यांना फार अभिमान असतो. तसा तो भंग्यानाही असतो. एक महिला महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका होते आणि ती ब्राम्हणी हिंदू धर्माचा त्याग करून सर्व देव अरबी समुद्रात नेऊन बुडवते. अश्या या महिलेने काल शनिवार दि.३१/१०/२०२० रोजी कल्याणला भेट दिली या प्रसंगी त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे जंगी स्वागत करण्यात आले. महात्मा जोतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदना घेण्यात आली.seema-patil-thane

 

शासकीय विश्राम ग्रह येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सीमा पाटील यांनी सांगितले की मी जरी हिंदू गुरव समाजात जन्माला आले तरी ते माझ्या हातात नव्हते. पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत बुद्ध धम्म याचा प्रचार करीन. तसेच माझी इच्छा आहे की नागपूर येथे दीक्षा भूमी येथे जाऊन माझ्या पाचशे लोकांना बरोबर घेऊन मी बौद्ध धम्म स्वीकारनार आहे. मी सर्व चाली रिती आणि हिंदु धर्माचा त्याग केलेला आहे.

या प्रसंगी भीम आर्मी चे नेते राजू झनके, अविनाश गायकवाड, सुनिल गायकवाड, राजेश गवळी, बाबा रामटेके, साहित्यिक विजय सुरवाडे, देवाचंद अंबादे, अडो. राहुल रामटेके, असे अनेक ठाणे जिल्हयातील कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी सीमा पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here