मुख्यमंत्री सुशिक्षित बेरोजगार कर्ज योजना देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक मॅनेजर ला प्रहार जनशक्ती पक्षाचा दणका : आदर्श भालेराव

bhujan-vikas-morcha

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – उपक्रमांच्या बाबतीत एक महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम / मुख्यमंत्र्यांच्या रोजगार निर्मिती कार्यक्रम किंवा मुख्यामंत्री रोजगार कार्यक्रम सुरू केला आहे. हा निर्णय राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी आहे. येत्या 5 वर्षात या उपक्रमातून 10 लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. या कार्यक्रमामुळे रोजगार वाढेल अशी अपेक्षा आहे. या माहितीनुसार मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात महिलांसाठी 30% आरक्षण निश्चित केले गेले आहे.

 

 

या कार्यक्रमामुळे पुरुष आणि महिला दोघांनाही रोजगार उपलब्ध होईल आणि ते एकत्रितपणे समाजात स्वावलंबी होतील. वैयक्तिक उद्योजक, संस्था, सहकारी, बचतगट, विश्वस्त हे सीएमईजीपी योजनेचे लाभार्थी असतील.

 

 

उद्योजकता प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. मंजूर झालेल्या प्रकल्पासाठी उत्पादन उपक्रमांसाठी 50 लाख रुपयांपर्यंत आणि सेवा क्षेत्राच्या कामांसाठी 10 लाखांपर्यंत खर्च आहे. सीएमईजीपी कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र राबविण्यासाठी राज्य सरकारने 1 ऑगस्ट 2019 मध्येउदयोग ऊर्जा व कामगार मंत्रालयाची बैठक घेऊन परिपत्रक काढले होते. त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कल्याण येथील महिला कमल धनले यांनी जिल्हा उद्योग केंद्र मध्ये ऑनलाईन कर्ज मंजुरी साठी अर्ज दाखल केला होता मुख्यमंत्री स्वयंम रोजगार योजने अंतर्गत कमल धनले यांना कर्जाची मंजुरी करून कल्याण येथील इंडियन ओव्हर्सिज बँक कर्ज मंजुरी साठी प्रस्ताव पाठवले असताना देखील इंडियन ओव्हर्सिज बँक च्या मॅनेजर यांनी काही त्रुटी काढून कर्ज प्रस्थाव नाकारल्या मुळे राज्य सरकार CMEGP योजनांची अमलबजावणी करत नाही याचा विरोध करत कोमल धनले संजय खरात ( म प्र कमिटी महा) यांनी बहुजन विकास मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 4 नोव्हेंबर 2020 रोजी आमरण उपोषण बसले होते.

 

 

ही बातमी प्रहार जनशक्ती पक्षाचे कल्याण तालुका संघटक आदर्श भालेराव यांना कळताच त्यांनी प्रहार जण शक्ती पक्ष ठाणे जिल्हा अध्यक्ष ऍड स्वप्नील पाटील व कल्याण तालुका प्रमुख तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण ठिकाणी पोहचून सर्व घटना संमजून घेतल्या नंतर प्रहार च्या वतिने मॅनेजर यांना संपर्क केला राज्य शासननिर्णय यांची माहिती दिली व राज्य सरकारे बेरोजगार नागरिकांसाठी उपलब्ध केलेल्या कर्ज योजनेचा लाभ मिळावा म्हणून सतत पाठपुरावा केला. व सदर बँक मॅनेजर आपल्या पदाचा गैर वापर करतोय सुशिक्षित बेरोजगार नागरिकांचा छळ करतोय या संदर्भात कोळशे वाडी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक (गुन्हे) मधुकर भोंगे यांचा निदर्शनास ही आणून दिले.

 

 

उपोषण बसलेल्या महिला ची 24 तास उलटून ही कोणत्याही प्रकारचे आरोग्य तपासणी ही झाली नसल्याने तत्काळ मुख्य वैदयकीय अधिकारी अश्विनी पाटील यांच्याशी संपर्क करून डॉ भानुशाली यांच्या कडून कोमल धनले व संजय खरात यांचा मेडिकल चेकअप करून घेतला व सदर उपोषण बसलेल्या लोकांच्या जीवास काही बर वाईट झाल्यास याला जबाबदार बँक मॅनेजर व सरकारी यंत्रणा असणार आहे व सदर बँक नागरिकांना जाणून बुजून कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याने प्रहार जनशक्ती पक्ष बेजबाबदार बँक मॅनेजर विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा ही इशारा देण्यात आला होता. व बँक मॅनेजर यांच्या कडून उपोषण करते यांचा उपोषण रद्द करण्यासाठी बँक मॅनेजर ने अनधिकृत पद्धतीने पोलिसांना हाताशी घेऊन दडपण आणणार्या कृतीस उघड केल्यामुळे बँक मॅनेजर ला दणका बसला व सदर बँक मॅनेजर यांची कान उघड करण्यासाठी सुनील वाघ यांनी बँक मॅनेजर यांच्या सत्य घटना निदर्शनास आणून दिले व कमल धनले यांच्या उपोषणास मानवी अन्याय निर्मूलन संघटनांच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष सौ सुवर्णा ताई कानवडे यांनी व द शिल्ड चे संस्थापक प्रशांत जाधव ,मधू आठवले व दिपू मोरे ,सामाजीक कार्यकर्ते मनोज वाघमारे यांनी पाठींबा दिला या सर्वांच्या मदतीने उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी इंडियन ओव्हरर्सिज च्या बँक मॅनेजर यांना कमल धनले यांच्या कर्जाच्या फाईल ला मंजुरी द्यावी लागली 3 लाखाच कर्ज मंजूर करणयाची हमी बँक मॅनेजर यांनी दिली कमी तिथे हमी म्हणजेच प्रहार जनशक्ती पक्षाच्या सतत पाठपुराव्या मुळे बहुजन विकास मोर्चा उपोषणाला यश मिळाले संजय खरात व कमल धनले यांनी प्रहार जनशक्ती पक्ष म द शिल्ड व मानवी अन्याय निर्मूलन संघटना मदतीला धावून जाऊन महिलेला न्याय मिळवून दिल्याबद्दल उपोषण कर्ते संजय खरात व कोमल धनले यांनी आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here