उन्हातान्हात कुशीत तान्हं बाळ घेऊन पोलिसांचं कर्तव्य बजावतेय वर्दीतील रणरागिणी

ranragini

नवी दिल्ली – सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. उन्हाळ्याची चाहुल लागली असून अंगाला भीषण चटके जाणवायला सुरूवात झाली आहे. असं असताना आपल्या चिमुकल्या बाळाला घेऊन या वाहतूक पोलीस अधिकारी आपली सेवा बजावत आहे.

हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन कौशिक यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं की, ‘ममत्व आणि कर्तव्याचा संगम.’ हा व्हिडीओ चंदीगड येथील असल्याचं समजत आहे. हा व्हिडीओ आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दोन दिवस आधी समोर आला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महिलांची कणखर बाजू समोर येताना दिसत आहे.

हातात चिमुकलं बाळ घेवून ऊन, वारा, वाहनांचा कर्कश आवाज, प्रदुषण अशा सर्व समस्या असताना ही महिला शांतपणे आपलं कर्तव्य बजावत आहे. तिच्या या कर्तृत्वाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. पण अनेकांनी पोलीस प्रशासनातील दुरावस्थेवर टिका केली आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत, संबंधित महिलेची ड्युटी वाहतूक विभागाच्या ऑफिसमध्ये लावायला हवी, जेणेकरून तिची आणि बाळाची तारांबळ उडणार नाही. कारण संबंधित महिला जरी तिचं कर्तव्य पार पाडत असली तरी बाळाला विनाकारण उन्हात राहावं लागत आहे.

एकीकडे सेवा बजावत असताना, दुसरीकडे बाळाच्या आरोग्याशी खेळलं जात आहे, अशी प्रतिक्रियाही एकाने दिली आहे. सचिन कौशिक यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला जवळपास 14 हजार लोकांनी पाहिलं आहे. तर जवळपास दीड हजार लोकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here