मेळघाट येथे कोरोना रुग्णावर मांत्रिकाकडून उपचार

अमरावती (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरैशी) – स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरदेखील आजही मेळघाटात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात बाळगली जात आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याचा मेळघाट परिसर अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. याठिकाणी अंद्धश्रद्धेला खातपाणी घालणाऱ्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. यामध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे.

मेळघाट येथे कोरोनाबाधित रुग्णावर एक मांत्रिक उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनाबाधित महिलेवर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्यानं ही घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी मेळघाटातील सेमाडोह आरोग्य केंद्रात एका 45 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर संबंधित महिलेवर रुग्णालयात उपचार करायचे सोडून नातेवाईक महिलेला उपचारासाठी मंत्रिकाकडे घेऊन गेले. मांत्रिकानेही संबंधित कोरोनाबाधित महिलेवर उपचार केले. पण उपचारादरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री संबंधित महिलेवर अंत्यसंस्कार केल्याची माहितीही समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी सांगितलं की, मेळघाटात यापूर्वी अनेक अशा अंधश्रद्धेच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी आरोग्य विषयक जनजागृती होणं खूप महत्त्वाचं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here