ग्रृप ग्रामपंचायत कुसुंबळेची डिजिटल प्लेटफॉर्म कडे आगेकूच

स्वात्तंत्रदिनी  ग्रामपंचायत ने दिली नागरिकांना अनोखी भेट

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) : भारत देशाचा राष्ट्रीय सण असणाऱ्या ७५ व्या स्वतंत्रता दिनाच्या निमित्त्याने अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत कुसुबळे येथें ग्रामपंचायत सरपंच यांचे हस्ते ध्वजारोहण सोहोळा पार पाडण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायतने डिजिटल प्लॅटफॉर्मकडे आगेकूच करण्याचे पाहिले पाऊल टाकण्यात आले.

तालुका प्रमुख राजा केणी यांचे नेतृत्वाखाली यशस्वी केले आहे, अलिबाग तालुक्यातील एकमेव आणि प्रत्येक क्षेत्रात पुढाकाराने नागरिकांना सेवा देणारी कुसुंबळे ग्रामपंचायत म्हणून ओळख निर्माण होत असताना ग्रामपंचायत कोणत्याही क्षेत्रात मागे राहता कामा नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असणारे ग्राप चे नेतृत्व राजा केणी यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म च्या दिशेने पाऊल उचलत ग्रामपंचायत कुसुबळे चे नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे, ग्रामपंचायत डिजिटल च्या माध्यमातून अँप द्वारे नागरिकांना घरबसल्या सेवा देण्याचे उत्कृष्ट कार्य ग्रामपंचायत  ने साध्य केले आहे,

एका आयटी क्षेत्रातील कंपनीच्या मदतीने डिजिटल प्लॅटफॉर्म कडे वाटचाल करण्यासाठी हा पहिला उपक्रम ग्रामपंचायत ने राबवला आहे ग्रामपंचायत च्या कामाच्या या नव्या पद्धतीमूळे डिजिटल प्लॅटफॉर्म कडे आगेकूच करणारी कुसबळे ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली असल्याचे उपस्थितांनी म्हटले आहे,

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जग प्रगती करत असताना आपल्या ग्रामीण भागातून देखील तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना घर बसल्या सेवा पुरवून नागरीकाचा वेळ व पैसा वाचवुन झटपट आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी व  सेवेतून प्रत्येकाला समाधान देऊन आदर्शवादी ग्रामपंचायत बनवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे तालुका प्रमुख राजा केणी यांनी उपस्थिती नागरिकाना सांगितले.

सदर कार्यक्रमास शिवसेना तालुका प्रमुख राजा केणी ग्रामपंचायत सरपंच मीना लोभी,उपसरपंच रसिका केणी, ग्रामसेवक श्री म्हात्रे साहेब, ग्रामपंचायत सदस्य उत्तम शेठ पाटील प्रमोद पाटील जागृती पाटील अर्चना पाटील प्रतिभा वाघ अतीश नाईक जेष्ठ नागरिक, पत्रकार, व महिला वर्ग उपस्थित होते. समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माजी आमदार मधू ठाकूर, गणपतराव देशमुख, माणिकराव जगताप, तसेच महाड येथे मृत पावलेल्या बांधवांना सदर कार्यक्रमातून श्रद्धांजली देण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here