मोदींच्या जन्मदिनी रेल्वेमंत्री वैष्णव यांनी रेल्वे स्टेशनवर मुलांना वाटले चॉकलेट, प्लॅटफार्मवर चालवली सफाई मशीन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी (दि.१७) रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव दुपारी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनची पाहणी करण्यासाठी पोहचले. रेल्वेमंत्र्यांनी या दरम्यान प्रवाशांसोबत ट्रेनच्या आत, प्लॅटफार्म आणि रेल्वे स्टेशनवर स्वच्छतेविषयी चर्चा केली. पीएम नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रेल्वेमंत्र्यांनी स्टेशनवरील मुलांना चॉकलेटसुद्धा वाटले. तसेच रेल्वेमंत्री स्टेशनवर स्वच्छतेची मशीन चालवताना दिसले. या दरम्यान उपस्थित प्रवाशी आणि अधिकारी आश्चर्यचकीत झाले होते.

यावेळी पत्रकारांसोबत चर्चा करताना त्यांनी म्हटले की, पीएम नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रेल्वेने दोन महत्वाचे कार्यक्रम सुरू केले आहेत. रेल्वेत कौशल्य विकास योजनेंतर्गत ५० हजार सहकार्‍यांना स्किल ट्रेनिंग दिले जाईल. तसेच देशभरातील ट्रेन, प्लॅटफार्म आणि रेल्वे स्टेशनवर स्वच्छता अभियान चालवले जाईल.

वैष्णव पुढे म्हणाले, पीएम नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे की, ट्रेनमध्ये प्रवास करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला सर्व सुविधा दिल्या जाव्यात. हे लक्षात घेवून आमचे मंत्रालय वेगाने काम करत आहे. ट्रेन, प्लॅटफार्म आणि स्टेशन स्वच्छ करत आहेत आणि ट्रेन वेळेवर चालवणे आमचे व्हिजन आहे.

वंदेभारत एक्सप्रेस आणि बुलेट ट्रेन प्रोजेक्टबाबत रेल्वेमंत्र्यांनी म्हटले की, पीएमच्या घोषणेनुसार दोन्ही प्रोजेक्ट आपल्या ठरलेल्या वेळी पूर्ण होतील. २०२३ पर्यंत प्रत्येक मोठ्या शहरातून वंदेभारत एक्सप्रेस सुरू होईल. बुलेट ट्रेन प्रोजेक्टचे काम सुद्धा वेगाने सुरू आहे. हे प्रोजेक्ट आम्ही वेळेवर पूर्ण करू. यावेळी रेल्वेमंत्री तिथे असलेल्या स्वच्छता गाडीवर बसले आणि त्यांनी प्लेटफार्म नंबर एकवर ती चालवून स्वच्छता पंधरवड्याची सुरूवात केली. यावेळी प्रवाशांची सुद्धा संवाद साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here