शिंदखेडा, दोंडाईचा, नरडाणा येथे भारत बंदला उर्त्स्फूत प्रतिसाद; दुकाने बंद ठेवुन व्यापाऱ्यांचा सहभाग

शिंदखेडा (प्रतिनिधी) : लखीमपूर खिरी येथे केंद्र सरकारच्या जाचक व अन्यायकारक कृषी कायद्याविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने मागुन वाहनाने शेतकऱ्यांना चिरडले. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना-महाविकास आघाडीतर्फे आज दि. 11 ऑक्टोंबर 2021 रोजी देशव्यापी भारत बंद पुकारण्यात आला होता.

त्यानिमित्ताने सकाळी 9.30 वाजता नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा येथे बंदला सुरुवात करण्यात आली. तिन्ही काळ्या कृषी कायदा व केंद्रसरकारच्या धोरणांविरोधात शिंदखेडा येथील वरपाडे चौफुली, नरडाणा चौफुली, तसेच गांव व दोंडाईचा येथे केंद्रसरकार विरोधात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी करत बंद यशस्वी करण्यात आला. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे दोंडाईच्यात बाजारपेठेत फिरुन दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत बंदमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदवला. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दोंडाईचा येथे नंदुरबार चौफुलीवर चक्काजाम करण्यात आले. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

shindkheda

याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, मेथी जि.प.चे सदस्य ज्ञानेश्वर भामरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, उपजिल्हासंघटक भाईदास पाटील, कल्याण बागल, तालुकाप्रमुख गिरीश देसले, काँग्रेस इंटकचे प्रमोद सिसोदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्यजीत सिसोदे, बेटावद जि.प.सदस्य ललित वारुडे, हिरालाल बोरसे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख नंदकिशोर पाटील, दिनेश बच्छाव, युवासेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कोळी, सागर पवार, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, शहरप्रमुख राजेश रुपचंदाणीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here