गृहरक्षक दलाच्या सर्वच जवानांना १०८ या रुग्णवाहिकेची माहिती असायलाच पाहिजे – आपत्ती तज्ञ जयपाल पाटील

अलिबाग (प्रतिनिधी) – अपघातस्थळी तातडीने पोचून जखमींना रुग्णालयापर्यंत पोचविण्याचे काम १०८ ही रुग्णवाहिका करीत असल्याने या रुग्णवाहिकेबाबतची माहिती गृहरक्षक दलाच्या सर्वच जवानांना माहिती असायला पाहिजे, असे मत आपत्ती तज्ञ जयपाल पाटील यांनी शुक्रवारी येथे मांडले.

जिल्हा होमगार्ड रायगड व नागरी संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने गोंधळपाडा येथील येथील होमगार्ड प्रशिक्षण केंद्रात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अप्पर पोलिस अधिक्षक तसेच होमगार्डचे जिल्हा समादेशक अतुल झेंडे हे होते.

फार पूर्वी अशी जलद सेवा नव्हती. मात्र आता ही सेवा सुरू झालेली असून, अशी सेवा संपूर्ण राज्यात सुरु आहे. अपघात झाल्याचे लक्षात येताच १०८ या क्रमांकावर रिंग केल्यास काही मिनिटातच रुग्णवाहिका घटनास्थळी पोचू शकते असे सांगून पाटील यांनी कार्यक्रम स्थळावरून १०८ या क्रमांकावर फोन करताच काही मिनिटातच रुग्णवाहिका प्रशिक्षण केंद्राठिकाणी पोचली. त्यानंतर या रुग्णवाहिकेबाबतची सविस्तर माहिती पाटील य़ांच्यासह रुग्णवाहिकेतील डॉ. पांडे व स्वप्निल पाटील यांनी प्रशिक्षणार्थिंना दिली. पाटील पुढे म्हणाले की, मोबाईल ही गरजेची वस्तू असली, तरी त्याचा वापर जपून करायला पाहिजे. आपल्या मोबाईलचा वापर त्रयस्त व्य़क्तीला करायला देऊ नये असेही ते म्हणाले. त्य़ाचबरोबर घरातील स्वयंपाकाचा गॅस असो, पिण्याचे पाणी असो, घरातील फ्रिज असो किवा आपल्या जवळील कोणतेही वाहन असो त्यांचाही वापर व्यवस्थितपणे न केल्यास आपल्यावर आपत्ती ओढवू शकते असेही पाटील म्हणाले.

homeguard-at-alibaug

जिल्हा अप्पर पोलिस अधिक्षक तसेच होमगार्डचे जिल्हा समादेशक अतुल झेंडे यांनी मार्गदर्शन करताना आपण स्वत:हून गृहरक्षक दलात आल्य़ाने आपल्या वाट्याला आलेले कोणतेही काम प्रामाणिकपणे आणि कोणतेही कारण न देता करायला पाहिजे असे सांगितले. रायगडमध्ये ज्यावेळी बंदोबस्त असतो, त्यावेळी काही जवान बंदोबस्ताठिकणी उपस्थित राहात नसल्याबद्दलची खंत बोलून दाखविताना आपल्यामुळे कोणतेही काम अडणार नाही याकडे जवानांनी पहायला पाहिजे, तसेच जवान ड्युटीवर असो किंवा नसो, त्यांनी नागरिकांशी उद्धटपणे वागू किंवा बोलू नये, तसेच जो कोणी जवान गैरवर्तन करेल अशा जवानाविरोधात कारवाई केली जाईल असेही झेंडे म्हणाले.

रुग्णवाहिकेतील डॉ. पांडे यांनी मागर्दर्शन करताना १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेला फोन केल्यास फोन करणाऱ्याने तेथून निघून न जाता, तेथेच रुग्णवाहिकेची वाट पहावी असे सांगितले. गृहरक्षक दलाचे केंद्र नायक सचिन गावडे यांनी प्रास्ताविक करीत उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here