यावल आगाराच्या बसवर दगडफेक झाल्याने पुन्हा एसटी सेवा ठप्प

यावल (तालुका प्रतिनिधी डॉ.मोहन साळुंके) : परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दोन दिवसात कामावर हजर राहण्याचे आवाहन केले असता यावल आगरातील १० ते १५ कर्मचारी आज कामावर हजर झाले होते. काही कर्मचाऱ्यांनी बस सेवा सुरु करण्याचा प्रयत्न केला असता काही अज्ञात व्यक्तींनी बसवर दगडफेक केली. दगडफेकीत्या या घटनेमुळे बस सेवा पुन्हा ठप्प झाली आहे .

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्चा आवाहनाला प्रतिसाद देत यावल आगाराचे १० ते १५ कर्मचारी कामावार हजर होवून बस सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होते. आगारातील १२ कामगारांना आगार प्रमुख शांताराम भालेराव यांना विभाग नियंत्रण यांच्या नोटिसेच्या संदर्भात रूजू होण्याबाबतचे पत्र दिले असता शुक्रवार दि.२६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास यावल आगारातून पंधरा-पंधरा मिनिटांच्या अंतराने जळगावसाठी तीन बसेस सोडण्यात आल्या.

जळगाव-विदगाव-जळगाव बस (क्रमांक एमएच.२०.बीएल ३४७१) यावलपासून चार किलोमीटर लांब वढोदे गावाजवळ सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास पोहचली असता काही अज्ञातांनी मोटर सायकलवर येवून बसवर दगड फेक करत काचा फोडल्या. घटनेमुळे यावल शहरात एकच खळबळ उडाली असून आगार प्रमुख भालेराव यांनी सदर माहिती यावल पोलीसांना कळवली असता पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या प्रकरणी रावेरचे पोलीस निरिक्षक तथा यावल प्रभारी कैलाश नागरे व यावलचे पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार, विनोद खांडबहाले व पथकासोबत बसेचा पंचनामा करून बस पुन्हा यावल आगारात रवाना केली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here