इचलकरंजी (महाराष्ट्र कार्यकारी संपादक मनोज सोनवले) : इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने सोमवारी दि.०६ डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्टेशन रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर..यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल जवळील अर्धपुतळ्यास इचलकरंजी नगरीचे प्रभारी अध्यक्ष तानाजी पोवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमधील प्रतिमेस माजी बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल, आरोग्य समिती सभापती संजय केंगार, शिक्षण समिती सभापती मनोज साळुंखे, कामगार अधिकारी विजय राजापुरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र माने, डॉ.श्री.अशोक महाजन, शाखा अभियंता अशोक माने, जनसंपर्क अधिकारी नितिनजी बनगे, शितल पाटील..सदाशिव शिंदे..अशोक कांबळे..संभाजी पोवार..सौ.प्रतिभा चौगुले..ज्योती साठे..सुनिता कांबळे.. श्री.अभिमन्यू कुरणे..सचिन शेडबाळे..मंजुनाथ खंदारे..आदी उपस्थित होते