८० टक्के स्थानिक कामगारांना रोजगार द्या; मनसे रोजगार सेनेची मागणी

ichalkaranji-nivedan

इचलकरंजी (महाराष्ट्र कार्यकारी संपादक मनोज सोनवले) : महाराष्ट्र नवनिर्माण रोजगार सेनेच्या वतीने आज कोल्हापूर जिल्ह्यातील ८० टक्के स्थानिक कामगारांना रोजगार द्यावा या मागणीचे निवेदन इचलकरंजी येथील प्रांताधिकारी यांना देण्यात आले


कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले शिरोळ व इचलकरंजी येथे मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय असून येथील उद्योजक व मालक हे स्थानिक कामगारांना कामावर न ठेवता बाहेर राज्यातून आलेल्या कामगारांना काम देऊन येथील स्थानिक कामगारांन वर अन्याय करत असल्याने येथील स्थानिक कामगार मनसे रोजगार सेनेच्या पदाधिकारी यांच्या कडे तक्रार केली होती आज मनसे रोजगार सेनेच्या वतीने इचलकरंजी येथील प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले


यावेळी मनसे सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष पुंडलिकराव जाधव (भाऊ) म्हणाले की, येथील उद्योजक हे महाराष्ट्र शासनाचे पैसे घेऊन उद्योग उभे करतात व बाहेर राज्यातील कामगारांना काम देतात तरी मनसे पक्षाची मागणी ही ८० टक्के महाराष्ट्रातील स्थानिक भूमी पुत्राना पहीला काम द्या अशी मागणी आहे तरी महाराष्ट्र शासनानी देखील जी आर काढला आहे तरी देखील येथील उद्योजक हे स्थानिक कामगारांना रोजगार देत नाहीत तरी जे उद्योजक मालक शासनाच्या नियम अटी मान्य करत नसेल तर अशांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या वेळी करण्यात आली


येत्या आठ दिवसांत या स्थानिक कामगारांना न्याय न मिळाल्यास मनसे रोजगार सेनेचे वतीने तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला यावेळी नायब तहसीलदार श्री काटकर म्हणाले जे उद्योजक मालक शासनाच्या नियमांचे पालन करत नसतील आशा उद्योजकाना व मालकाना बोलवून आपली व त्यांची बैठक मा प्रांताधिकारी साहेब कामगार आयुक्त यांना सांगून घेण्यात येईल जर उद्योजक व मालक शासनाचे नियम पाळत नसतील तर अशा उद्योजक व मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सागितले


निवेदन देते वेळी मनसे रोजगार सेनेचे कोल्हापूर जिल्हा संघटक राजेंद्र निकम मनसे जिल्हा उपाध्यक्ष रवी गोंदकर मनसे कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष मोहन मालवणकर सहकार सेनेचे जिल्हा अध्यक्ष मनोहर जोशी विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष विनायक मुसळे रोजगार सेनेचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख अनिरुद्ध पाटील तालुका संघटक राहुल दवडते इचलकरंजी शहर सचिव महेश शेंडे शहर उपाध्यक्ष उत्तम पाटील कामगार सेनेचे सचिन बिरांजे प्रदिप कदम विजय फराकटे रफीक नदाफ टिपू जमादार रविकिरण दौंडे राकेश हरवंदे रमेश शितोळे रजनेश सोनार हरीष गौडर इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते व कामगार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here