इचलकरंजी नगरपरिषद सफाई कामगार बदलीप्रश्नी सकारात्मक निर्णय घेणार – तानाजी पोवार

ichalkaranji-tanaji-powar

इचलकरंजी (महाराष्ट्र कार्यकारी संपादक मनोज सोनवले) : येथील नगरपरिषद सफाई कामगार बदलीप्रश्नी मुख्याधिकारी यांच्या सोबत पुढील आठवड्यात बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा.. तानाजी पोवार यांनी सांगितले.


मुख्याधिकारी.डॉ.प्रदीप ठेंगल यांनी इचलकरंजी नगरपालिकेतील विविध विभागात काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या आरोग्य विभागात स्वच्छतेसाठी बदल्या केलेल्या आहेत..या अनुषंगाने माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या मागणी नुसार मंगळवार दि.०७ डिसेंबर रोजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी आपल्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते..सदर बैठकीत या विषयासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.


मुख्याधिकारी कामानिमित्त परगावी असल्याने पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले सदर बैठकीस आरोग्य समिती सभापती संजय केंगार, माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते माजी नगरसेवक जहांगीर पट्टेकरी, कामगार नेते सुभाष मालपाणी, शिवाजी जगताप, कामगार अधिकारी विजय राजापुरे, मुख्य स्वच्छता निरिक्षक सुर्यकांत चव्हाण, स्वच्छता निरिक्षक विजय पाटील, नौशाद जावळे, अविनाश कांबळे, रॉबिन कांबळे आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here