इचलकरंजी (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर सतीश चव्हाण) : पोलीस बॉईज असोसिएशनच्या ८ वर्धापन दिनानिमित्त जुनी नगरपालिका इचलकरंजी येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले या मध्ये सत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रमाची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस या प्रतिमेचे पूजन विकास अडसुळे (पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा इचलकरंजी) यांच्या हस्ते योजनांनी झाले दिप प्रज्वलन संजय जाधव (ट्राफिक पोलीस) यांच्या हस्ते करण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे हे होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत हातकणंगले तालुका उपाध्यक्ष राहुल ओझा यांनी केले व प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण यांनी केले. कोरोणा योद्धा यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला मातोश्री ब्लड बँक यांचे प्रमुख डॉक्टर देवेंद्र गुरव व त्यांचे सर्व सहकारी यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी आपल्या मनोगतामध्ये पोलीस बॉईज चे काम संपूर्ण राज्यामध्ये अतिशय चांगले प्रकारे सुरू आहे पोलीस खात्याला अडचणीत्या वेळी पोलीस बॉईज असोसिएशन नेहमी मदत करतो असे मत व्यक्त केले विकास अडसुळे पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा इचरकंजी यांनी पोलीस बॉईज असोसिएशनची नेहमी सख्या भावाप्रमाणे खास मित्र प्रमाणे मी नेहमी साथ असतो असे मत व्यक्त केले
यावेळी एस डी पाटील तलाठी कबनुर, जी आर गोणसावीस सर्कल कबनुर, शिवाजी चव्हाण कोतवाल, नितेश तराळ (पोलीस पाटील रूई), प्रा. रवींद्र पाटील (दैनिक सकाळचे पत्रकार), दिपक पाटील (अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी संघटना), राजेंद्र जगदेव (दैनिक तरुणभारत), सैफ मुजावर ग्रामपंचायत सदस्य कबनूर, शंकर पोवार, महेश कांबळे (नवदुर्गा मंडप कबनूर), भुवनेश्वर निमगडे( चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष), रमजान शेख (उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष) आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राजेंद्र सुतार एनएलपी ट्रेनर यांचा माईंड पॉवर सेमिनार घेण्यात आला मनातील सकारात्मक विचार कसे वाढावे हे सांगितले यशस्वी जीवनाच्या राजमार्ग बद्दल माइंड प्रोग्रॅमिग केले. यावेळी पोलिस बॉईज असोसिएशन चे रमाकांत साळी इचलकरंजी शहराध्यक्ष, विजय बोराडे ,संदीप नाईक, संतोष गिरगावे ,संतोष चौगुले , परशुराम करजगावकर, निशांत कुंभार हात.तालुका अध्यक्ष, शितल सुतार ,विशाल प्रकाश चव्हाण( तालुका अध्यक्ष), मनोज रामा नाईक( तालुका उपाध्यक्ष),मंथन मकरंद भडगावकर (तालुका कार्याध्यक्ष),अंकुश भरमा पुजेरी(गडहिंग्लज संपर्क प्रमुख),रोहित आप्पासाहेब कुंभार( प्रसिद्धी प्रमुख),हारीश वसंत मागे(तालुका सचिव), मा.माधुरी वाडकर मॅडम (हातकणंगले तालुका महिला अध्यक्षा) मा.शुभांगी पाटील (करवीर तालुकाध्यक्ष महिला अध्यक्षा) मा.चेतना कांबळे (शिरोळ तालुका उपाध्यक्षा) मा.अश्विनी कांबळे (कागल तालुका महिला शहराध्यक्षा) मा.वैशाली बिराजदार (शिरोळ तालुका महिला संघटक) मा.सारिका लोखंडे (इचलकरंजी शहराध्यक्षा) तेजस्विनी पाटील कागल सदस्य, कार्यक्रमाच्या शेवटी आभार जनार्दन चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय चव्हाण यांनी केले.