अत्तरवाल्या पियुष जैनकडे सापडली दीडशे कोटींची माया

150-crore-found-in-Piyush-Jain-house-kanpur

कानपूर (उत्तरप्रदेश) : अत्तर व्यापारी पीयुष जैन यांच्या कानपूर येथील घरावर आयकर विभागाने टाकलेल्या धाडीमध्ये सुमारे १५० कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे. विशेष म्हणजे, एवढी मोठी रक्कम नेण्यासाठी आयकर विभागाला चक्क कंटेनर मागवण्याची वेळ आली.

पीयुष जैन हे सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे जवळचे मित्र असून काही दिवसांपूर्वी लॉंच केलेल्या समाजवादी परफ्युममुळे ते चर्चेत होते. जीएसटी इंटेलिजन्स महानिदेशायल (डीजीजीआय) आणि आयकर विभागाने संयुक्तरीत्या गुरुवारी दुपारी पीयुष जैन यांच्या कनौज येथील आनंदपुरी येथील घरावर धाड टाकली होती. या धाडीमध्ये अधिकाऱयांना कपाटामध्ये नोटांनी भरलेले कार्टन आढळले होते.

५०० रुपयांच्या नोटांचे बंडल बनवून संपूर्ण रोकड ठेवली होती. हे गठ्ठे सहजपणे कुठेही कुरीअर करता येतील अशापद्धतीने त्याची पॅकिंग केली होती. माहितीनुसार, नोटा मोजण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी चार मशीन घेऊन गेले होते. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चार मशीनमधून ४० कोटी रुपये मोजले गेले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी नोटा मोजण्यासाठी आणखी मशीन्स आणि एसबीआयच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. शुक्रवारी दुपारपर्यंत डोळे विस्फारणारे घबाड समोर आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here