राजूर पोलिसांनी आवळल्या दारू माफियांच्या मुसक्या

अहमदनगर (प्रतिनिधी संजय महाजन) : अकोले तालुक्यातील राजूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दारू माफियांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अवैध दारुची वाहतूक करणारे तीन आरोपी वाहनांसह राजूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

सोमवार दि. २७ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास संताजी चौक राजूर येथे दोन इसम मोटार सायकलवर दारूचे बॉक्स घेऊन येणार असल्याची माहिती राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना मिळाली. सदर वाहनावर कारवाई करण्याकरिता एका टीमला संताजी चौक राजूर येथे रवाना केले असता तेथे दोन इसम काळ्या रंगाच्या मोटार सायकलवर निलेश अशोक घाटकर, (रा. राजूर) याला दारुचे बॉक्स देत असताना छापा टाकून गाडीसह सदर दोन इसम व निलेश घाटकर यांना ताब्यात घेतले.

त्यांच्या ताब्यातील दारूचा मुद्देमाल ११५२०/-रु.कि.च्या बॉबी संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या १९२ सिलबंद बाटल्या प्रत्येकी १८० मिली.४०,०००/-रु.कि. हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस विना नंबरची असा एकूण ५१,५२० रुपयांच्या मुद्देमालासह निलेश अशोक घाटकर, ओम रामदास उघडे (वय २२, रा. म्हाळदेवी, ता. अकोले), सचिन सुदाम जाधव (वय २५, रा. संगमनेर) यांच्या विरुद्ध राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार, पोलीस हवालदार कैलास नेहे, पोलीस नाईक देवीदास भडकवाड, अशोक गाडे, विजय फटांगरे, राकेश मुळाने आदी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here