डोंबिवलीच्या फरार ताडीविक्रेत्याला विष्णूनगर पोलिसांनी केले २४ तासांत जेरबंद

vishnunagar-police-station-thane

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : ताडीचे सेवन केल्याने डोंबिवलीमधील कोपर गावात दोन तरूण मृत्यमुखी पडल्याची घटना काल, मंगळवारी घडली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी ताडी विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आरोपी रवी बथानी हा फरार होता. तो परराज्यात पळून जात असतानाच, विष्णूनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खिल्लारे व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कळंबोली सेक्टर १४ मधून अटक केली.


ताडीचे अतिसेवन केल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीच्या कोपर परिसरात काल, मंगळवारी घडली होती. सचिन पाडमुख व स्वप्नील चोळके अशी दोन मृत तरुणांची नावे आहेत. स्वप्नील चोळके हा डोंबिवली शहर वाहतूक विभागात वॉर्डन म्हणून कार्यरत होता. ताडीच्या अतिसेवनामुळे दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांकडून सागण्यात आले होते. परंतु त्यांचा मृत्यू अतिसेवनाने न होता, पावडरचे मिश्रण असलेल्या ताडीमुळे झाला असल्याचे स्वप्निल चोळके याचा भाऊ सिद्धार्थ चोळके यांनी सांगितले. तसे पत्र देखील त्यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात दिले आहे.


डोंबिवली पश्चिम कोपर परिसरात राहणारे सचिन पाडमुख आणि स्वप्नील चोळके हे दोघे काल सायंकाळी आपल्या मित्रांसह कोपर गाव रेल्वे रुळालगत असलेल्या ताडी सेंटरवर ताडी पिण्यासाठी गेले होते. नऊ वाजण्याच्या सुमारास सचिन पडमुख व स्वप्नील चोळके घरी परतत असताना, रस्त्यात त्यांना त्रास जाणवू लागला. त्याच्या मित्रांनी दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहचण्यापूर्वी या दोघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलिसांनी ताडीविक्रेता रवी विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here