दि. १४ जानेवारी राशिभविष्य : मकर राशीतील सूर्याच्या प्रवेशासह शनी आणि बुधाचा संयोग देईल या राशींना शुभफल

rashi-bhavishya

मेष – आज करिअर क्षेत्रात तुम्हाला सुखद परिणाम मिळतील. तुम्हाला सहकाऱ्यांची साथ मिळेल. या राशीच्या काही लोकांना वडिलांच्या माध्यमातून लाभ मिळू शकतो. सामाजिक स्तरावर तुम्ही लोकांची मने जिंकू शकतात. आज तुमच्या दहाव्या स्थानी सूर्याचा संचार होणार आहे, त्यामुळे मेष राशीच्या काही लोकांना इच्छित नोकरी मिळू शकते.

 

वृषभ – नशिबाची साथ मिळेल, धार्मिक कार्यात भाग घेता येईल. या राशीचे काही लोक या दिवशी कुटुंबीयांसह घरी पूजा-पाठ करू शकतात. मनःशांतीचा अनुभव घ्याल. आर्थिकदृष्ट्या पूर्वी काही अडचणी आल्या असतील तर आज त्या दूर होतील. आरोग्य देखील चांगले राहील.

कर्क – आज तुम्हाला तुमच्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल अन्यथा सामाजिक स्तरावर तुमच्या प्रतिमेवर नकारात्मक प्रभाव पडेल. अनोळखी व्यक्तीच्या मदतीने पैसे मिळू शकतात. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी दिवस लाभदायक राहील. एखादी अज्ञात भीती तुम्हाला अस्वस्थ करू शकते.

कर्क – कार्यक्षेत्रातील तुमच्या कामामुळे वरिष्ठ प्रभावित होऊ शकतात. व्यावसायिकांना पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. या दिवशी, कौटुंबिक जीवनात सावधगिरी बाळगा, जोडीदाराशी बोलताना तुम्ही शब्दांचा योग्य वापर करावा. या राशीचे काही लोक घरातील कामात व्यस्त दिसू शकतात.

 

सिंह – आज तुम्हाला विरोधकांपासून सावध राहावे लागेल. आज तुमच्या सहाव्या स्थानी सूर्याचे भ्रमण होईल, त्यामुळे प्रतिस्पर्धी सक्रिय होऊ शकतात. चंद्र तुमच्या दहाव्या स्थानी विराजमान असेल. तुमच्या कर्तृत्वाने तुम्ही प्रतिकूल परिस्थितीतही चांगली कामगिरी करू शकता. या राशीच्या लोकांना सरकारी काम करताना काळजी घ्यावी लागेल.

कन्या – आज कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात यश मिळू शकते. तुमच्या बोलण्यातून आत्मविश्वास दिसेल ज्यामुळे सामाजिक स्तरावर चांगले परिणाम मिळू शकतात. या राशीचे काही लोक मुलाच्या बाजूने चिंतेत दिसू शकतात. प्रेम जीवनामध्ये आज रोमांस वाढू शकतो.

 

तूळ – आज मनात येणारे नकोसे विचार दूर करण्यासाठी प्राणायाम करावा. या राशीच्या काही लोकांना आईच्या आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल. काही सरकारी अडथळ्यांमुळे कोणतेही रखडलेले काम आज पूर्ण होऊ शकते. जमीन किंवा घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या राशीच्या लोकांचे स्वप्न आज पूर्ण होऊ शकते.

वृश्चिक – सूर्याच्या राशी परिवर्तनाने आज तुमच्या धैर्य आणि सामर्थ्यामध्ये वाढ दिसेल. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही सहकाऱ्यांना मदत करतांना दिसून याल. साहसी काम करणाऱ्या या राशीच्या लोकांना काही संधी मिळू शकते. या दिवशी या राशीचे काही लोक त्यांच्या जोडीदारासह थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाऊ शकतात.

धनु – आज अतिउत्साहात येऊन तुम्ही एखाद्याचे मन दुखवू शकता. त्यामुळे बोलताना संयम बाळगा. या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत यश मिळेल, जर पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळू शकतात. या दिवशी तुमच्या मनातील गुपिते कोणासमोर उघड करू नका, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. उच्च शिक्षण घेणाऱ्या या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवस संमिश्र जाईल.

 

मकर – आजचा दिवस आनंददायी असू शकतो. मनाच्या चंचलतेवर नियंत्रण ठेवता येईल. मात्र, या राशीच्या काही लोकांना आज डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. आईच्या बाजूच्या लोकांकडून तुम्हाला लाभ मिळू शकतो. जोडीदार तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात साथ देईल. प्रेम जीवनामध्येही चांगले बदल दिसून येतील.

कुंभ – या दिवशी परदेशी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या कामाबाबत कौतुक मिळू शकते. आर्थिक बाजूने थोडे सावध राहावे लागणार असले तरी संध्याकाळी खर्च वाढू शकतो. जर तुम्हाला अध्यात्मिक गोष्टींमध्ये रस असेल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. घरातील एखाद्या सदस्याचे आरोग्य बिघडू शकते.

मीन – आज अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. मकर राशीत सूर्याच्या भ्रमणामुळे तुम्हाला विविध स्त्रोतांकडून लाभ मिळू शकतात. कौटुंबिक जीवनात सुखद बदल होऊ शकतात. तुमची मोठी भावंडे तुम्हाला चांगल्या मित्राप्रमाणे सल्ला देताना दिसतील. जे अनेक दिवसांपासून रोजगाराच्या शोधात होते, त्यांचे स्वप्नही या दिवशी पूर्ण होऊ शकते.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here