सावरवाड येथे इंधनाने भरलेला टँकर पलटी होऊन पेटला

tanker-in-fire
File photo

मालवण (प्रतिनिधी) : डिझेल व पेट्रोल घेऊन येणाऱ्या भगवती पेट्रोलिअम पंपाच्या मालकीच्या टँकरचा शुक्रवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. सावरवाड येथे अपघात झाला असून चालकाच्या पायाला दुखापत झाली आहे. सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, टँकरचे मोठे नुकसान झाले.

चौके येथील भगवती पेट्रोलिअमचा टँकर एमएच ०७ – पी १२१२ हा नेहमीप्रमाणे सांगलीहून चौके येथे पेट्रोल आणि डिझेल घेऊन येताना मालवण सावरवाड गणेश मंदिर येथे आला. त्यावेळी अपघात होत रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. यावेळी टँकरमध्ये ६ हजार लिटर पेट्रोल तर ६ हजार लिटर डिझेल होते, अशी प्राथमिक माहिती मिळते. अपघातानंतर शॉर्टसर्किट झाल्याने आगीचा भडका उडाला. बघता बघता संपूर्ण टँकरने पेट घेतला. सुदैवाने चालक स्फोट होण्यापूर्वी बाहेर पडल्याने तो बचावला. परंतु, चालकाच्या पायाला दुखापत झाली . मात्र टँकरचे मोठे नुकसान झाले असून टँकर जळून खाक झाला. टॅंकरला आग लागल्याची माहीती मिळताच कुडाळ एमआयडीसीचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला.

यावेळी कर्मचारी जे. आर. तडवी, अग्निशमन अधिकारी अग्निशामक प्रमुख व्ही. के.राणे, ए. एस. डीचवलकर, व्ही. टी. शिंदे, एस. के. जाधव चालक, एस. एल. पाटील आणि डी. एस. दळवी यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here