अजिंक्यक्रांती फाऊंडेशनने गरजूंना वह्या पुस्तके वाटून साजरी केली गुरुपोर्णिमा

ajinkyakranti-foundation-dharngaon

धरणगाव (प्रतिनिधी) : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून पष्टाणे येथे ग्रामीण भागातील, झोपडपट्टीत राहणाच्या गरजू व होतकरू मुला मुलींना वह्या पुस्तके वाटप करण्यात आली.तसेच प्रत्यक्ष घरोघरी जाऊन शिक्षणाचे महत्व सांगितले

यावेळी त्यांच्या पालकांना समजावून व बजावून सांगितले की, तुमचा पाल्य दररोज शाळेत जायला हवा…! जेणेकरून तो शिक्षणापासून वंचित राहणार नाही.वह्या पुस्तके दिल्यानंतर लहान मुला मुलींच्या चेहऱ्यावरच हास्य पाहून अजिंक्यक्रांती फाऊंडेशनच्या उपस्थित सदस्यांना गुरुपौर्णिमा सार्थक झाल्याचे समाधान मिळाले.

या प्रसंगी अजिंक्यक्रांती फाऊंडेशनचे प्रदेश संघटक विवेक जाधव कार्यकारिणी सदस्य विशाल जाधव, उदय जाधव, लोकेश ठाकरे, दुर्गेश जाधव, निखिल पाटील, मनिष पाटील,धनंजय पाटील आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here