सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) : शेगाव दुमाला परिसरातील एका वारकरी शिक्षण संस्थेतील तीस विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सर्व विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर आहे. हे सर्व विद्यार्थी राज्याच्या विविध भागातून येथील आश्रमात शिक्षणासाठी आले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेगाव दुमाला येथील ६५ एकर जवळ विठ्ठल आश्रम आहे. येथील आश्रमात विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षण दिले जाते. रविवारी दुपारी आश्रमात विद्यार्थ्यांना जेवणात बासुंदी देण्यात आली होती. जेवणानंतर विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती रुग्णालयातून मिळाली. हे सर्व विद्यार्थी राज्याच्या विविध भागातून येथील आश्रमात शिक्षणासाठी आले आहेत.
विठ्ठल आश्रमातील सुदर्शन सगरे, प्रदीप शिरोळे, ओंकार निर्मळ, प्रणव शिंदे, गोपाळ सुलतानी, दर्शन जाधव, गौरव जायभाय, विनायक ताडे, सिध्देश्वर शिर्के, वैभव कुंभार, प्रफुल्ल नवले, सुदर्शन सुलतानी, अजिनाथ मालकर, केशव पवार, हरिओम तळेकर , अभिजीत शिंदे, लक्ष्मण हुके, ऋषीकेश कोल्हे, नितीन गव्हाड, ऋषीकेश तांबे, अर्जून पवार, गणेश राहाणे, प्रताप गिते, ऋषीकेश चव्हाण, अभिषेक मोरे, करण परदेशी, माऊली गोनासे, आदित्य डावरे, स्वागत गाजरे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समजली आहे.