राजधानी दिल्लीत १२ वर्षीय मुलाची निर्भयासारखी अवस्था; चार नराधमांचे कृत्य

minor-boy-gangrapped-in-delhi

दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : आतापर्यत महिला असुरक्षित असल्याचा मुद्दा चर्चिला जात होता. आता मात्र चक्क आपल्या देशाच्या राजधानीतच लहान मुलेही सुरक्षित नसल्याची घटना घडली आहे. दिल्लीत चार नराधमांनी १२ वर्षीय मुलासोबत क्रूर कृत्य केले असून, या मुलाची भयंकर अवस्था करण्यात आली आहे. त्याचा प्रायव्हेट पार्टही जखमी झाला आहे. त्याची अवस्था पाहून कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे.सीलमपूर भागातील ४ जणांनी १२ वर्षांच्या मुलावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर त्याला जबर मारहाण केली. यानंतर आरोपींनी सर्व मर्यादा ओलांडल्या आणि मुलाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घुसवला. घटनेच्या चार दिवसात पोलिसांनी सर्व माहिती एकत्र केली आहे. रविवारी सायंकाळी उशिरा दिली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलावर एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तब्बल 3 अल्पवयीन मुलांनी त्याचे शोषण केले. यात एक चुलत मुलगाही आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी ट्विट करून लिहिलं आहे की, दिल्लीत मुलंही सुरक्षित नाहीत. एका १२ वर्षांच्या मुलावर ४ जणांनी अत्याचार केला आणि काठीने मारहाण केली. अर्धमेलेल्या अवस्थेत त्याला सोडून देण्यात आलं. या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात एक आरोपीला अटक करण्यात आली असून तिघेजण अद्याप फरार आहेत. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित आणि कथित आरोपी शेजारी आणि मित्र आहेत. ते समान वयाचे आहेत. आरोपींमध्ये एक चुलत भाऊदेखील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here