फेक न्यूज पसरवणाऱ्या १० यूट्यूब चॅनेल आणि ४५ व्हिडिओंवर सरकारने घातली बंदी

government-banned-youtube-channel

नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : देशात धार्मिक तेढ पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० यूट्यूब चॅनेलवर केंद्र सरकारने सोमवारी बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. बनावट बातम्या आणि धार्मिक समुदायांविरूद्ध द्वेष पसरवणाऱ्या व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी ही माहिती दिली.माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले की, गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि सल्ल्यानुसार १० यूट्यूब चॅनेलचे ४५ व्हिडिओ ब्लॉक करण्यात आले आहेत. एका अधिकृत निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ज्या व्हिडिओंवर बंदी घालण्यात आली आहे त्यांना एकूण १.३० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. यामध्ये सरकारने काही समुदायांचे धार्मिक अधिकार काढून घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. ठाकूर म्हणाले की या चॅनेलमध्ये धर्मामध्ये भीती आणि गोंधळ पसरवणारा मजकूर आहे.बंदी घातलेल्या यूट्यूब चॅनेल आणि व्हिडिओंमध्ये बनावट बातम्या आणि धार्मिक समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने प्रसारित केलेले मॉर्फ केलेले व्हिडिओ समाविष्ट आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातलेल्या काही व्हिडिओंचा वापर अग्निपथ योजना, सशस्त्र सेना, हिंदुस्थानची राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा, काश्मीर या विषयांवर चुकीची माहिती पसरवण्यासाठी केला जात होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here