विमानप्रवासात मद्यपान करणाऱ्या दोघांना अटक

Two-people-were-arrested-for-drinking-during-flight

नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : पाटणा इंडिगो फ्लाइटमधील दोन मद्यधुंद प्रवाशांना पाटणा विमानतळ पोलिसांनी केंद्रीय सुरक्षा दलाच्या मदतीने रविवारी संध्याकाळी देशांतर्गत उड्डाणसेवेत मद्यपान केल्याबद्दल अटक केली. असा हवाई प्रवास करणं प्रतिबंधित आहे.

 

सूत्रांनी सांगितले की, विमानात कोणताही गोंधळ झाला नाही आणि क्रू सदस्याने हस्तक्षेप केल्यावर प्रवासी थांबले आणि माफी मागितली.प्रोटोकॉलनुसार, एअरलाइनने एअर ट्रॅफिक कंट्रोलरला याची माहिती दिली आणि पोहोचल्यावर त्यांना अटक करण्यात आली.

 

दिल्लीहून प्रवासी विमानात चढले तेव्हा दोन्ही प्रवासी मद्यधुंद अवस्थेत होते आणि ८० मिनिटांच्या विमान प्रवासात त्यांनी मद्यपान सुरू ठेवण्याचा प्रयत्न सुरु ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here