वैशाली (बिहार) : लग्नाच्या अगोदरच्या दिवशी करण्यात येणाऱ्या ग्रामीण पूजेत मुलींसोबत नृत्य करण्यास मज्जाव केल्याच्या रागातून टवाळखोरांनी बालिकेला पेट्रोल टाकून पेटवल्याने खळबळ उडाली. ही घटना वैशाली जिल्ह्यातील राजापाकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेत पीडित बालिका गंभीर झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
राजापाकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात लग्न होते. या लग्नाच्या अगोदरच्या दिवशी ग्रामीण पूजेत काही मुली नृत्य करत होत्या. यावेळी काही टवाळखोर यावेळी नृत्य करण्यासाठी घुसले होते. त्यामुळे काही मुलींनी त्यांना नृत्य करण्यास मज्जव केला. त्यामुळे टवाळखोरांना राग आाला.
टवाळखोरांना नृत्य करण्यास मज्जाव करताना एका सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या बालिकेचाही समावेश होता. त्यामुळे वरातीवरुन परतल्यानंतर टवाळखोरांनी त्या बालिकेला अडवले. मात्र बालिकेने आरडाओरडा केल्यामुळे टवाळखओरांनी यावळी तेथून पळ काढला. त्यामुळे बालिकेने ही बाब कोणालाही न सांगता घरी आजीसोबत जाऊन झोपली. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी बालिका उठून शौचास जाताना दोन टवाळखोरांनी तिचे तोंड दाबून तिला उचलून नेले. घरापासून थोडे दूर नेल्यानंतर त्यांनी तिला पेटवून देणार असल्याचे सांगत तिच्यावर पेट्रोल टाकले. काहीही मागेपुढे न पाहता, त्यांनी तिला पेटवून दिले. त्यामुळे पीडिता गंभीर भाजली. तिने आरडाओरडा केल्यामुळे शेजाऱ्यांनी धाव घेत तिची आगीतून सुटका केली.
बालिकेवर पेट्रोल टाकून जाळल्यामुळे देशभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी घटनेतील पीडितेला हाजीपूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हाजीपूर रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.