रस्त्यावर कपडे विकणाऱ्या फेरीवाल्याने केला ३६६ कोटींचा जीएसटी घोटाळा?

366-crores-GST-scam-done-by-the-hawker

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) : येथे रस्त्यावर कपडे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तीच्या फर्मच्या खात्यावरून ३६६ कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. दिवसाला जेमतेम ५०० रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या या व्यक्तीच्या घरावर जीएसटी विभागाने छापा टाकल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. त्या व्यक्तीवर कराच्या माध्यमातून ३६६ कोटी रुपये कमावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

मुझफ्फरनगरच्या कव्वाल गावातील रहिवासी एजाज कुमार जब्बार याने दोन वर्षांपूर्वी आझाद एंटरप्रायझेस फर्मच्या नावाने भंगाराचे काम सुरू केले होते. त्या माध्यमातून एजाज दररोज ५०० ते १००० रुपयांचा व्यवसाय करत असे. या व्यवसायात यश न आल्याने त्याने कपडे खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पण त्यातही नफा न झाल्याने एजाजने रस्त्यावर कपडे विकण्यास सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी रात्री जीएसटी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फौजफाट्यासह त्याच्या घरावर छापा टाकला.

 

जीएसटी विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या फर्मवर छापा टाकण्यात आला त्या फर्मकडून ३६६ कोटी रुपयांच्या वस्तूंच्या विक्रीचे ई-वे बिल कापण्यात आले आहे. याप्रकरणी जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सखोल तपास सुरू केला आहे. मात्र, याप्रकरणी अद्यापही कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here