तलवारी विकणाऱ्या इसमास छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेने केले जेरबंद

sambhajinagar-police

छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) । सोमवार (दि.१९) सहाय्यक फौजदार शेख हबीब यांना गोपनिय माहिती मिळाली की, रेल्वेस्टेशन परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे एक इसम मोठया प्रमाणावर धारदार तलवारी गुन्हेगारी कृत्याकरीता विक्री करण्यासाठी फिरत आहे.

 

 

याबाबत शेख हबीब यांनी पोउपनि अमोल म्हस्के यांना तात्काळ माहिती दिली असता, पोउपनि अमोक म्हस्के व त्यांचे सोबतच्या गुन्हेशाखेच्या पथकाने मिळालेल्या बातमी प्रमाणे रेल्वेस्टेशन भागात जावून सापळा लावुन बातमीतील वर्णनाचा इसम त्याच्या हातात वायरची पिशवीत संशयास्पद स्थितीत फिरतांना दिसताच त्यास शिताफीने पकडून त्याच्या हातातील वायरच्या पिशवीची झडती घेतली असता पिशवीत कापडात गुंडाळुन ठेवलेल्या विविध आकाराच्या एकुण ६ धारदार व टोकदार तलवारी मिळुन आल्या.

 

 

सदर ६ धारदार तलवारी ताब्यात घेवुन सदर इसमास त्याचे नांव गांव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव बबलुसिंग कालुसिंग भोंड, (वय २८ वर्ष, रा. अलाना कंपनीसमोर, पैठणरोड, चितेपिंपळगांव, ता. पैठण, जि. संभाजीनगर) असे सांगीतले. त्यास तलवारी घेवुन फिरण्याचे कारण विचारले असता त्याने काहीएक समाधान कारक उत्तर दिले नाही. सदर इसम त्याचे ताब्यात असलेल्या धारदार तलवारी गुन्हेगारी कृत्यासाठी विक्री करण्याचे उददेशाने घेवुन जात असल्याने बबलुसिंग कालुसिंग भोंड याचे विरुध्द पोह पोपटराव मनगटे यांचे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे वेदांतनगर, छत्रपती संभाजीनगर येथे गुरनं १२४/२०२३ कलम ४/२५ भारतीय हत्यार कायदा सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय.) अपर्णा गिते, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संदीप गुरमे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अमोल म्हस्के, सफौ/सतीश जाधव, सफौ / शेख हबीब, पोलीस अंमलदार सुधाकर मिसाळ, पोपट मनगटे, संजयसिह राजपुत, राजाराम डाखुरे सर्व नेमणुक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here