निफाड तालुक्यातील नैताळे येथे सरण रचून मराठा कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण सुरू

niphad-maratha-uposhan

उपोषणस्थळी छत्रपती संभाजी राजे यांनी दिली भेट

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जारंगे पाटील. यांनी गेले -बारा दिवसापासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केलेले आहे.त्यांची प्रक्रुती खालावत चालली आहे, त्यांना समर्थन म्हणून नैताळे येथील मराठा शेतकरी. वाल्मीक गंगाराम बोरगुडे. यांनी आज सकाळी आठ वाजेपासून नैताळे येथे सरण रचुन आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

 

उपोषणस्थळी छत्रपती संभाजी राजे. यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन भेट देऊन तुमच्या भावना समजून घेतल्या,समाज बांधवांच्या तिव्र भावना शासनापर्यंत पाठवून समस्त मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीत आहे.असे म्हणत आमरण उपोषण करताना तुम्ही मात्र तब्येतीची काळजी घ्या. असे आवाहन संभाजी राजे यांनी केले आहे.

 

 

सकाळी आठ वाजता नैताळे परिसरातील असंख्य मराठा तरुण आमरण उपोषण स्थळी जमा झाले. विविध प्रकारच्या घोषणा देऊन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून. उपोषणा सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील भजनी मंडळी टाळ मृदुंगाच्या गजरात उपोषण स्थळी भजन म्हणत आहे. यासाठी गावातील असंख्य तरुण उपोषणास बसले आहे. निफाड पोलीस स्टेशनचे पीआय श्री.महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषणस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपोषणाचा पहिला दिवस असला तरी त्याची व्याप्ती लक्षात घेता त्याचे पडसाद जिल्हाभरात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here