जयपूर (वृत्तसंस्था) : भरतपूर येथे बुधवारी सकाळी भीषण रस्ता अपघात घडला. येथे गुजरातहून यूपीकडे जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेल्या बसला एका ट्रकने मागून धडक दिली. हा अपघात झाला तेव्हा बस रस्त्याच्या कडेला उभी होती, असे वृत्त आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस उत्तर प्रदेशातील मथुरा येथे येत असताना आग्रा-जयपूर महामार्गावर नादबाईजवळ थांबली असता एका ट्रेलरने या बसला धडक दिली.
#WATCH | Rajasthan | 11 people killed and 12 injured when a trailer vehicle rammed into a bus on Jaipur-Agra Highway near Hantra in Bharatpur District, confirms SP Bharatpur, Mridul Kachawa. The passengers on the bus were going from Bhavnagar in Gujarat to Mathura in Uttar… pic.twitter.com/1nYUkj3J9z
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) September 13, 2023
एएनआयच्या ट्विटरवरील पोस्टनुसार भरतपूर जिल्ह्यातील हंत्राजवळ जयपूर-आग्रा महामार्गावर एका ट्रेलर वाहनाने बसला धडक दिल्याने ११ जण ठार आणि १२ जखमी झाले, अशी माहिती भरतपूरचे एसपी मृदुल कचावा यांनी दिली. बसमधील प्रवासी गुजरातमधील भावनगरहून उत्तर प्रदेशातील मथुरा येथे जात होते. जखमींना दाखल करण्यात आलेल्या रुग्णालयातील दृश्ये एएनआयने पोस्ट केली आहे.