मुझफ्फरपूर (बिहार) : नदीत लहान मुलांनी भरलेली बोट उलटली आहे. या दुर्घटनेत २० मुलांना वाचवण्यात यश आलं असून अद्यापही १६ हून आधिक मुलं बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळालीये. सदर घटनेची माहिती मिळताच शोध आणि बचावकार्यास सुरूवात झाली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गायघाट येथील बेनियाबाद ओपी परिसरातील मधुपट्टी घाटात ही बोट पलटी झाली. बोटीतून सुमारे ३३ लहान मुलं प्रवास करत होते. शाळकरी मुलांची बोट नदीत पलटल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. नदीमधील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने बोट बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. बेपत्ता मुलांचा शोध घेण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.