कोर्टात सुनावणीपूर्वी पत्नीने पतीला सगळ्यांसमोर चोपला

crime
File Photo

बिहार (वृत्तसंस्था) : हुंडाप्रकरणी दावा सुरु असल्याने, सुनावणीसाठी पत्नी आणि तिचे वडील कोर्टात पोहोचले. त्यावेळी दोघांनी मिळून नवऱ्याला बेदम मारहाण करीत असल्याचं व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतो आहे. इतकं कडाक्याचं भांडण सुरु होत की, कोर्टातील लोक एका जागी उभे राहून हा सगळा प्रकार पाहत होते.

नवऱ्यावरती चिडलेली पत्नी सगळ्यांच्या समोर चप्पलने मारहाण करीत होती. तिथं असलेल्या लोकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यावेळी लोकांनी या दोघांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी पत्नी शांत झाली. त्यावेळी पतीला तिथून वकिलांनी बाहेर काढले. एक वर्षापूर्वी त्या दोघांचं लग्न झालं होतं. मात्र दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. त्यामुळे हे प्रकरण कोर्टात आलं. आता सुनावणी होण्याआधीच पत्नीने मात्र सगळ्यांच्यासमोर पतील बेदम मारहाण केल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

अंजू कुमारी असं पत्नीचं नावं असून, ती सध्या माहेरी राहत होती. त्यानंतर नवऱ्याने हुंडा मागितल्याचा आरोप पत्नीने केला आहे. सासरकडच्या लोकांनी लग्नात दोन लाख रुपये रोख, एक मोटार सायकल, हे सगळं दिल्यानंतर सुध्दा पती सासरच्या लोकांकडे हुंडा मागत आहे. बुधवारी कोर्टाची तारिख असल्यामुळे दोघही पोहोचले होते. त्यावेळी दोघांच्यात तिथं वाद झाला. चिडलेल्या पत्नीनं चप्पलने पतीला मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. कोर्टात कामासाठी आलेल्या लोकांनी त्या दोघांचं भांडणं सोडवलं आहे. दोन्ही वकिलांनी दोघांना पुन्हा समजून सांगितलं आहे.व्हिडीओ सोशस मीडियावर व्हायरल झाल्यापासून याची अधिक चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here