पारनेर तालुक्यातील सहकारी पतसंस्था सक्षम आहेत , अफवांवर विश्वास ठेवू नका – सहाय्यक निबंधक गणेश औटी

पारनेर पतसंस्था

पारनेर (प्रतिनिधी दिपक वरखडे) : पारनेर तालुक्यातील नागरी सहकारी पतसंस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम असून ठेवीदारांनी अफवांवर विश्वास ठेवून ठेवीदारांनी मुदती आपल्या ठेवी काढून घेवू नये , असे प्रतिपादन पारनेरचे सहाय्यक निबंधक गणेश औटी यांनी केले आहे .

मंगळवार दि. २३ जानेवारी २०२४ रोजी पारनेर येथील नगर जिल्हा सहकारी बँकेच्या गुलाबराव शेळके सभागृहात नागरी/ ग्रामीण सहकारी पतसंस्थांचे आदर्श उपविधी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे १६ जानेवारी २०२४ चे पत्रान्वये पतसंस्थामार्फत अभिप्राय मागवण्यात आलेल्या नुसार चर्चासत्र आयोजीत करण्यात आले होते . त्या चर्चा सत्रात पारनेर चे सहाय्यक निबंधक गणेश औटी बोलत होते. राज्य फेडरेशनचे अध्यक्ष तथा आदर्श उपविधी दुरुस्ती समिती सदस्य काका कोयटे, राज्य फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन , सभापती काशिनाथ दाते सर , बाबासाहेब कवाद निघोज ग्रामीण पतसंस्था चेअरमन वसंतराव कवाद, सेनापती बापट पतसंस्था चेअरमन रामदास भोसले, पारनेर तालुका पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष शिवाजी मोरे, साई मल्टी स्टेट पतसंस्थेचे चेअरमन वसंतराव चेडे, नगर जिल्हा सहकारी बँकेचे पारनेर तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे तर दृक श्राव्य माध्यमा व्दारे सहभागी झालेले जिल्हा बँकेच्या संचालिका गितांजली शेळके, जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड प्रमुख उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना औटी म्हणाले की , पारनेर तालुक्यातील पतसंस्था अतिशय सक्षम आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका, एकाच वेळी सर्व ठेवीदारांनी पैशाची मागणी केल्यास कोणतेही संस्था किंवा राष्ट्रीयकृत बँक देखील एकदम ठेवी परत करू शकत नाही. एवढी जाणीव सर्व ठेवीदारांनी ठेवावी आणि पतसंस्थांना सहकार्य करावे. एखादा दुसरा अपवाद असू शकतो .पारनेर तालुक्यातील स्थानिक राजकारण किंवा आपापसातील मतभेद असल्याकारणाने म्हणा ,विनाकारण द्वेष पसरून, अफवा पसरून, संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. या अफवांमुळे पतसंस्थांचे नुकसान होऊ नये, यासाठी संस्था चालकांनी एकमेकांशी चर्चा करून एकमेकांना आधार देण्यासाठी आजचा हा पतसंस्था आदर्श उपविधी मध्ये दुरुस्ती करणे संदर्भात चर्चासत्र आयोजित केले असल्याचे माहिती निबंधक औटी यांनी दिली. यामध्ये व्यवस्थापक यांची शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, सहकार क्षेत्रातील कमीत कमी दोन वर्षाचा व्यवस्थापक पदाचा अनुभव असावा, संस्था कर्मचारी यांना द्यावयाचे कर्ज तारणी असावी, स्वनिधीच्या २० टक्के असावे, ज्या संस्थांच्या कर्मचारी वर्गात निबंधकाने मंजूर केलेल्या सेवा नियमानुसार कर्ज व्याजदर ठेवावा, संस्थेचे सर्व कामकाज संगणीकृत असावे, ठेवींच्या प्रमाणात कार्यालय भाडे असावी, एकूण ठेवीच्या प्रमाणात कर्मचारी वेतन असावे, शासन परिपत्रकानुसार ३१/०३ अखेर १००% एनपीए तरतूद करणे आवश्यक राहील, शासन परिपत्रकानुसार मार्च महिन्यातील ३१/०३ अखेर १०० टक्के थकव्यात तरतूद करणे आवश्यक राहील व तो व्यवहार दुबेरची असेल, सीआरएआर शासनाच्या शासन परिपत्रकानुसार मार्च महिन्यातील ३१/०३ अखेर प्रमाण ९% पेक्षा जास्त राहील, नियामक मंडळ यांनी वेळोवेळी केलेले बदल संस्थेस मान्य राहील अशी प्रस्तावित दुरुस्त्यांची मागणी केलेल्या आहेत.

यावेळी करण्यात आलेले ठराव वैधानिक गुंतवणूक रोख तरळता प्रमाण (सीआरआर) प्रणालीतून कर्ज वाटप करणे , कर्मचारी सेवा नियम लागू करणे , राज्य / तालुका फेडरेशनचे सभासदत्व , स्थैर्य निधी देणे हे मांडण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता हांडे यांनी केले, यावेळी पारनेर तालुक्यातील विविध पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, संचालक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व आदर्श उपविधी दुरुस्ती समितीचे सदस्य काका कोयटे म्हणाले की , पारनेर तालुक्यातील ८६ पतसंस्थांचा वैधानिक तरलता निधी च्या माध्यमातून १४२५ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. पारनेर तालुक्यातील पतसंस्थांची गुंतवणूक तब्बल ५५३ कोटी रुपयांची आहे. म्हणजे शासननाच्या नियमानुसार संस्थांचा एसएलआर २५% राखण्याची मर्यादा असते, परंतु पारनेर तालुक्यातील तरलता ३८.८0% आहे. याचा अर्थ पारनेर तालुक्यातील पतसंस्था किती सक्षम आहे हे दिसते ,याला आपण प्रसिद्धी दिली पाहिजे. परिस्थिती खूप सक्षम आहे अफवा पसरू नका, जिल्ह्यातील एकूण पतसंस्थांच्या ठेवीपैकी १४.०२ टक्के ठेवी एकट्या पारनेर तालुक्यातील आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील ठेवीदारांनी घाबरण्याचे कारण नाही. एकही संस्था अडचणीत येणार नाही याची जबाबदारी राज्य फेडरेशन घेत असल्याची ग्वाही देतो , अशी ग्वाही ही काका कोयटे यांनी या प्रसंगी दिली .

या चर्चासत्रात दृक श्राव्य माध्यमांच्या व्दारे सहभागी झालेले नगर जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड म्हणाले की , ऑनलाईन वरुन पारनेर तालुका सहकाराचा उगम आहे. राज्यात आपली एक ओळख आहे‌. सहकार चळवळ टिकणे अत्यंत गरजेचे आहे. जिल्हा बँकेचा प्रतिनिधी म्हणून एक ग्वाही देतो, आपली जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आयोजीत करून ज्या संस्थां ची अंदाज पत्रकानुसार आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणार. यावेळी दाते सरांनी गायकवाड यांना सुचवले की ,बँकेच्या पुढील बैठकीमध्ये ज्या संस्था अडचणीत आहेत ,त्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यास संचालक गायकवाड यांनी प्रतिसाद दिला .

या चर्चासत्रास दृक श्राव्य माध्यमांव्दारे सहभागी झालेल्या नगर जिल्हा बँकेच्या संचालिका व गुलाबराव शेळके महानगर बँकेच्या संचालिका गितांजली शेळके म्हणाल्या की , जी एस महानगर व जिल्हा बँकेत पारनेरच्या पतसंस्थेच्या मोठ्या प्रमाणावर ठेवी आहेत. पारनेरच्या पतसंस्था अतिशय सक्षम आहेत. पतसंस्था ह्या ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी फार मदतगार आहेत. ठेवीदारांनी कष्टाचे पैसे आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या बँकेत अथवा पतसंस्थेत ठेवलेले असतात, त्याची जबाबदारी आपण सर्वांनी पाळली पाहिजे , असे ही संचालिका शेळके म्हणाल्या .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here