सलमान खानला पुन्हा धमकी, एकास अटक

salman-khan

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : अभिनेता सलमान खान याला जिवे मारण्याची धमकी देत दोन कोटींची मागणी करणाऱ्या आझम मोहम्मद मुस्तफा (वय ५६) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तो वांद्रेचा रहिवासी आहे.

 

मंगळवारी सकाळी दहा ते सव्वादहाच्या सुमारास वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील हेल्पलाइनवर अज्ञात व्यक्तीने सलमानला जिवे मारण्याची धमकी देत दोन कोटींची मागणी केली. वेगवेगळे संदेश धाडून त्याने ही मागणी केली.

 

वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी प्रकाश सुतार, सचिन पालवे आणि अंमलदार मुजावर, चव्हाण आणि बोडके यांनी आरोपीचा मोबाइल क्रमांकाचे सीडीआर लोकेशनद्वारे शोध सुरू केला. तो वांद्रे परिसरात असल्याचे समोर येताच तेथून मुस्तफाला अटक करण्यात आली. बुधवारी त्याला न्यायालयाने ३१ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here