पोलीस कॉन्स्टेबलने पोलीस स्थानकातच स्वत:वर गोळी झाडत संपवलं आपलं आयुष्य

gun-fire
file photo

लखनऊ (उत्तरप्रदेश) : एका पोलीस स्थानकात तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने पोलीस स्थानकातच स्वत:वर गोळी झाडत आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील गालशहीद पोलीस स्टेशनमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या कॉन्स्टेबलने मंगळवारी (२९ ऑक्टोबर) दुपारी स्वतःवर गोळी झाडून घेतली. रोडवेज चौकीच्या आत कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी जखमी कॉन्स्टेबल कपिलला तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे जखमी कॉन्स्टेबलची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांना तात्काळ उपचारासाठी उच्च केंद्रात पाठवण्यात आले आहे.

 

मुरादाबाद जिल्ह्यातील गलशहीद पोलीस ठाण्यात अडीच वर्षांपासून तैनात असलेल्या एका कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. कॉन्स्टेबल कपिल कुमारचा १० नोव्हेंबरला साखरपुडा होता. त्यापूर्वी तो एका महिला कॉन्स्टेबलसह पोलीस चौकीत गेला आणि अचानक संशयास्पद परिस्थितीत त्याने स्वत:वर गोळी झाडून घेतली. रोडवेज चौकीत एका कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

 

याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलीस कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. याशिवाय, पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे. शहरातील पोलीस अधीक्षक रणविजय सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, कपिल कुमार नावाच्या कॉन्स्टेबलने सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकारी कॉन्स्टेबलला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

कॉन्स्टेबलची प्रकृती गंभीर असल्याचं लक्षात येताच डॉक्टरांनी त्यांना उच्च केंद्रात पाठवण्याचा सल्ला दिला. त्यावरुन त्यांना पुढील उपचारासाठी उच्च केंद्रात पाठवण्यात आलं आहे. जखमी कॉन्स्टेबलची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. ही घटना घडली तेव्हा घटनास्थळी एक महिला कॉन्स्टेबलही उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here