पत्नीने नशेत असलेल्या पतीचे गुप्तांग कापले

knief

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर दिल्लीत राहणाऱ्या एका युवकाला नशा करुन घरी येणे आणि पत्नीशी भांडण करणे महागात पडले. पत्नीने त्याचे गुप्तांग कापले आणि पळून गेली. पोलिसांनी शनिवारी घटनेची माहिती दिली. पीडित व्यक्ती सध्या दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

 

पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवार-शुक्रवारीच्या मध्यरात्रीची आहे. रूप नगर पोलीस ठाण्याला प्रथम माहिती मिळाली होती. शनिवारी पीडिताचा जबाब नोंदवण्यात आला. त्याने पोलिसांना सांगितले की तो मूळचा बिहारचा आहे. काही महिन्यांपूर्वी तो पत्नीला घेऊन दिल्लीला आला होता. तो शक्ती नगर येथील एका पेइंग गेस्टमध्ये मदतनीस म्हणून काम करतो.

 

घटनेच्या रात्री तो नशा करून घरी आला होता. पत्नीसोबत त्याचे भांडण झाले होते. भांडणानंतर त्याची पत्नी घराबाहेर पडली आणि तो झोपी गेला. काही वेळाने महिला घरी परतली आणि तीक्ष्ण धारदार शस्त्राने पतीचे गुप्तांग कापले. हल्ला होताच पीडित ओरडू लागला. त्याने आपल्या पत्नीला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो करू शकला नाही. त्याच्या शरीरातून वेगाने रक्त निघत होते. दरम्यान, पत्नीला गंभीर जखमी केल्यानंतर महिला पळून गेली. पीडिताच्या किंचाळी ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले.

 

पती आणि पत्नी दोघांचे हे तिसरे लग्न आहे. जखमीला प्रथम बारा हिंदू राव रुग्णालयात नेण्यात आले होते. नंतर त्याला सफदरजंग रुग्णालयात आणण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी महिला अद्याप फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. पतीच्या नशेच्या सवयीमुळे पत्नी नाराज असायची अशी माहिती मिळाली आहे. दारू पिण्यावरून यापूर्वीही दोघांचे भांडण झाले होते. महिलेने पतीला अनेक वेळा नशा करू नकोस असा इशारा दिला होता, पण तो त्याने ऐकला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here