जयपूर (राजस्थान) (वृत्तसंस्था) : दिल्लीहून बिझनेस मीटिंगसाठी विमानाने जयपूरला आलेल्या एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ती रात्री नऊ वाजता हॉटेलमध्ये पोहोचली आणि त्यानंतर बारा वाजण्याच्या सुमारास रडत बाहेर पडली. बाहेर काही लोकांकडे चौकशी केल्यानंतर ती पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई केली, परंतु तोपर्यंत आरोपी पसार झाला होता.
जयपूरच्या बजाज नगर पोलीस ठाण्यात महिलेने गुन्हा दाखल केला आहे. तिने सांगितले की ती गाझियाबादहून आली होती. रेड फॉक्स नावाच्या हॉटेलमध्ये डीके शर्मा नावाच्या एका व्यक्तीने तिला बोलावले होते. ती जयपूरपर्यंत आपला व्यवसाय वाढवू इच्छित होती आणि यासाठी डीके शर्माने मदत करण्याचे आश्वासन दिले होते. काही दिवसांपूर्वीच पीडित महिलेने शर्माशी फोनवरून बोलणे केले होते आणि त्यानंतर दोन्हीमध्ये ओळख झाली होती.
शर्माने ७ नोव्हेंबर रोजी मीटिंगच्या नावाखाली महिलेला जयपूरला बोलावले होते. विमानतळाजवळील रेड फॉक्स हॉटेलमध्ये महिला रात्री नऊ वाजता पोहोचली. त्यानंतर तिने रिसेप्शनवर डीके शर्माबद्दल विचारणा केली असता तो हॉटेलच्याच एका खोलीत असल्याचे कळले. महिला तिथे पोहोचली आणि त्यानंतर रात्री बारा वाजता रडत बाहेर आली. तिने पोलिसांना सांगितले की मीटिंगदरम्यान तिने कोल्ड्रिंक प्यायली होती, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली आणि त्यानंतर जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती नग्न अवस्थेत होती. तिने कसेबसे कपडे घातले आणि बाहेर पळाली. पोलिसांनी त्याच रात्री हॉटेलवर छापा टाकला, परंतु तोपर्यंत आरोपी तिथून निघून गेला होता.