एमसीबी (छत्तीसगड) : येथील अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला ३ शिक्षकांनी ब्लॅकमेल करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. यात डेप्युटी रेंजरनेही सहकार्य केले आहे. याप्रकरणी एमसीबी जिल्हा पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून मंगळवारी त्यांची कारागृहात रवानगी केली. वास्तविक, एका शिक्षकाने एका विद्यार्थ्याचा अश्लील व्हिडिओ बनवला होता आणि तो दाखवून तिला ब्लॅकमेल केले जात होते. आठवडाभरात शिक्षकांनी विद्यार्थिनीला दोन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. विद्यार्थिनीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
जिल्ह्यात नियुक्त प्रभारी मुख्याध्यापकासह एकाच शाळेतील दोन शिक्षकांनी १५ आणि २२ नोव्हेंबर रोजी विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला होता. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या आईने मंगळवारी संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात तत्काळ कारवाई करत पोलिसांनी प्रभारी मुख्याध्यापक, २ शिक्षक आणि एका उप रेंजरला अटक केली आहे. पोलिसांनी चौघांना मंगळवारी बीएनएसच्या कलम 70 (2), 49, 351 (2) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ६ आणि १७ अंतर्गत न्यायालयात हजर केले, तेथून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले.
विद्यार्थिनीने तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराची आपबिती आईला सांगितली होती. याबाबत विद्यार्थिनीच्या आईने संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आईने सांगितले की, तिची मुलगी अकरावीत शिकत असून भाड्याच्या घरात राहते. १५ नोव्हेंबर रोजी एका शिक्षकाने तीला कारमध्ये बसवले. विद्यार्थिनीला तिच्या अभ्यासात मदत करणार असल्याचे त्यांने सांगितले होते
यानंतर तीला दुसऱ्या शिक्षकाच्या घरी नेण्यात आले. येथे प्रभारी मुख्याध्यापक आधीच हजर होते. यानंतर तिघांनीही शिक्षकाच्या बेडरूममध्ये नेऊन एकामागून एक बलात्कार केला. विद्यार्थीनीच्या आईने सांगितले की, २२ नोव्हेंबर रोजी मुलगी सामान घेण्यासाठी जात असताना शिक्षक तिला दुचाकीवरून डेप्युटी रेंजरच्या घरी घेऊन गेले. याआधी बलात्काराचे आरोप असलेले शिक्षकही येथे उपस्थित होते. यानंतर त्यांनी पुन्हा मुलीवर सामूहिक बलात्कार केला.
सामूहिक बलात्काराच्या घटनेत सहभागी असलेल्या एका शिक्षकाने विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडिओ बनवला होता. सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर तीन शिक्षक आणि डेप्युटी रेंजरने सामूहिक बलात्कार केला. ही गोष्ट कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली जात होती.