जबरी चोरीतील सराईत आरोपी पोलिसांकडून मुद्देमालासह जेरबंद

कल्याण पोलीस

ठाणे (प्रतिनिधी लक्ष्मीनारायण वनम) : कोळशेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ९३० / २०२४, बी. एन. एस. २०२३ चे कलम ३०९ (४), ३(५) या गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा घटक ३ कल्याण कडुन करण्यात येत असतांना नमुद गुन्हयातील व ठाणे शहरात विविध ठिकाणी केलेल्या जबरी चोरीतील संशयीत इसम हे आंबिवली, ता. कल्याण परिसरात येणार असलेबाबत बातमीदार मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली होती.

 

त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक – ०३ कल्याण कडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी आदिवली परिसरातील इराणी वस्तीमध्ये सापळा लावुन सराईत इसम नामे – १ ) तौफीक तेजीब हुसेन वय २९ वर्षे मुळ राह: – चिंदरी रोड, बदुरूदीन कॉलनी, बिदर, कनार्टक, सध्या राह: – इंदिरानगर, वाल्मिकी शाळेसमोर, आंबिवली पश्चिम २) मोहम्मद अली उर्फ कालीचरण झेवेरी अली वय ३६ वर्षे राह:- चिंदरी रोड, बदुरूदीन कॉलनी, बिदर, कनार्टक ३) अब्बास सल्लु जाफरी वय २७ वर्षे रा. स्वतःचे घर, गल्ली नं. ०४, भास्कर शाळेच्या जवळ, पाटील नगर आबिवंली कल्याण पश्चिम ४) सुरज उर्फ छोटया मनोज सांळूखे, वय १९ वर्ष, राह. माउली कृपा चाळ, रूम नं. १, पाटील बाबाचा बेडा परिसर, पाटील नगर, बेडयाचा पाडा, आंबिवली पश्चिम, कल्याण, जि. ठाणे यांना मोठया शिताफिने ताब्यात घेण्यात आले.

 

आरोपीताकडुन ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात चैन स्नॅचिंगचे ४० गुन्हे, मोबाईल चोरीचे २४ गुन्हे, वाहन चोरीचे ०६ गुन्हे असे एकुण ७० गुन्हे केले असल्याची कबुली दिली असुन त्यांनी चैन स्नॅचिंग करून चोरी केलेला एकुण ५१ तोळे (५१० ग्रॅम) वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने, २४ वेगवेगळया कंपनीचे मोबाईल फोन तसेच ०६ मोटार सायकली, एक मारूती स्विप्ट कार असा एकुण ५०,१८,००० /- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून एकुण ७० गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असुन मोबाईल चोरी व वाहन चोरीचे गुन्हे कोणकोणते ठिकाणी केले आहेत याचा तपास सुरू आहे.

 

ही कामगिरी आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त ठाणे शहर, पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व शेखर बागडे, सहा. पोलीस आयुक्त, (शोध १) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सपोनि / संतोष उगलमुगले, पोउपनि / विनोद पाटील, पोलीस अमलंदार दत्ताराम भोसले, विलास कडु, अनुप कामत, प्रशात वानखेडे, गोरखनाथ पोटे, किशोर पाटील, उल्हास खंडारे, अदिक जाधव, सचिन वानखेडे, दिपक महाजन, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विजेंद्र नवसारे, विनोद चन्ने, गोरक्ष शेकडे, सतिश सोनवणे, रविंद्र लांडगे, महिला पोलीस अंमलदार ज्योत्स्ना कुंभारे, मिनाक्षी खेडेकर, मंगल गावित यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here