चंदीगड (हरियाणा) : बिहारच्या कुख्यात मोस्ट वाँटेड गँगस्टरचा बिहार आणि हरियाणा या दोन राज्यातील पोलिसांनी मिळून त्याचा एन्काऊंटर केला.
याबाबत बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात गँगस्टर गुंड सरोज राय याच्यावर ३२ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. बिहारमधील सीतामढी इथल्या जनता दल युनायटेडच्या आमदाराकडून खंडणी मागितल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. बिहार पोलिसांनी गँगस्टर सरोज रायवर २ लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
बिहार आणि हरियाणा या दोन राज्याच्या पोलिसांनी संयुक्तपणे त्याचा शोध सुरू केला. अखेर गुरुग्राममध्ये कुख्यात गँगस्टर सरोज राय आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीत गँगस्टर सरोज रायचा खात्मा करण्यात बिहार आणि हरियाणाच्या पोलिसांना यश आलं. या चकमकीत बिहार पोलिसांच्या एका जवानाला गोळी लागल्यानं हा जवान जखमी झाला. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बिहार पोलीस जवानाच्या हाताला गोळी लागली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
तपासणी मोहिमेत दुचाकीस्वार दोन तरुण गुर्जर चौकीजवळून जाऊ लागले. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी या तरुणांना थांबण्याचा इशारा केला. मात्र त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. यामुळे पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात गँगस्टर सरोज रायचा मृत्यू झाला. त्याचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला.