डुमरी (झारखंड) : येखील एका तरुणाने आपल्या प्रेयसीवर बलात्कार करून तिची हत्या केली आणि मृतदेहाचे ४० तुकडे करून जंगलात फेकून दिले. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण व पीडिता गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंधात होते. काही मतभेदांमुळे आरोपीने पीडितेला एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. यानंतर, आरोपीने मृतदेहाचे ४० तुकडे केले आणि जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकले.