यावल नगरपालिकेची बेधडक कारवाई; गटारी बांधकामासाठी पक्के अतिक्रमण काढले

अतिक्रमणधारकाच्या एका कानशिलात फटका दुसरा वाचविला.

यावल (सुरेश पाटील) गटारीचे बांधकाम एका सरळ रेषेत करताना झालेल्या पक्या अतिक्रमणामुळे गटारीचे काम गेल्या पंधरा दिवसापासून बंद पडले होते. परंतु काल दिनांक 20 गुरुवार2020 रोजी यावल नगरपालिका स्थापत्य अभियंता योगेश मदने, स्वच्छता विभाग निरीक्षक शिवानंद कानडे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख रमाकांत मोरे, यांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांसह माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, सामाजिक कार्यकर्ते मुबारक तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत व वार्डातील नागरिकांच्या उपस्थितीत तिरुपती नगर भागातील अतिक्रमण जेसीबी मशिनच्या साह्याने काढण्याची बेधडक कारवाई केली यामुळे संपूर्ण यावल शहरात अतिक्रमणधारकांना मध्ये एकच खळबळ उडाली आहे.
तिरुपती नगर भागातील गटारीचे बांधकाम करताना एकाच मालकाची एक दुमजली इमारत आणि एक मजली इमारत रस्त्याच्या लागून आहे. यापैकी एका घरासमोर अनधिकृत केलेले अतिक्रमण गटार बांधकामासाठी अडथळा ठरल्याने यावल नगरपालिकेने ते अतिक्रमण जेसीबी मशिनच्या साह्याने गुरुवार दि.20 रोजी काढले. उत्तर-दक्षिण असलेल्या या रस्त्यावर एकाच मालकाने दोन वेगवेगळ्या घराचे पक्के बांधकाम केलेले आहे दोन्ही घराच्या दर्शनी भागा समोर अंदाजे चार ते पाच फुटाचे अतिक्रमण केले आहे त्यापैकी एकाचं घराचे अतिक्रमण काढल्याने नगरपरिषदेने घरमालकाच्या फक्त एकाच कानशिलात मारून अतिक्रमणांचा जेसीबी मशीनचा हातोडा मारून दुसऱ्या घरासमोरील अतिक्रमण न काढल्याने दुसरी कांनशीला वाचवून घेतली असल्याची तिरुपतीनगर मध्ये बोलले जात आहे. घरमालकाने टोलेजंग इमारती बांधताना यावल नगरपालिकेकडून परवानगी घेताना प्लॅन इस्टीमेंट प्रमाणेच बांधकाम केलेले आहे किंवा नाही ? किंवा परवानगी घेतलेली आहे किंवा नाही ? याबाबत सुद्धा उपस्थित नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यावल नगरपालिका स्थापत्य अभियंता योगेश मदने यांच्या आधी यावल नगर परिषदेच्या गेल्या 20 वर्षाच्या कालावधीत यावल शहरात व यावल नगरपालिका विकसित हद्दीत झालेल्या आरसीसी पक्के बांधकामात 90 टक्के लोकांनी अनाधिकृतपणे कोणतीही परवानगी न घेता आपापल्या सोईप्रमाणे अतिक्रमण करून सार्वजनिक रस्ते गिळकृत करून घेतले आहे त्यामुळे यावल नगरपालिकेला आता गटारीचे बांधकाम करताना मोठा अडठळा निर्माण होत असुन कारण नसताना नागरिक, यावल नगरपालिका कर्मचारी, व बांधकाम ठेकेदारांत शाब्दिक चकमक उडत आहे. त्यामुळे यावल नगरपालिका प्रशासन व यावल न.पा. सदस्यांनी ठोस निर्णय घेऊन अतिक्रमणाबाबत कडक कारवाई करावी अशीच सर्वस्तरातून मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here