यशवंत निकवाडे यांनी स्वलिखीत पुस्तक जगण्याची संजीवनी भेट देऊन मनिषाताई चौधरी यांचा गौरव

dondaicha

दोंडाईचा (प्रतिनिधी) – आज शिरपूर सुवर्ण नगरीत मनिषाताई चौधरी (समन्वयक, महाराष्ट्र राज्य, अब्दुल कलाम फांउडेशन, दिल्ली) यांचे आगमन झाले.त्यांनी कोरोना काळात राज्यभर,व देशभर खूपच उल्लेखनीय कार्य केलेले आहे. छोटे,मोठे काम करणारे असंख्य समाजसेवकांची,दानशूर व्यक्तींची दखल घेऊन त्यांच्या कार्याच्या प्रमाणपत्र देऊन सन्मान केलेला आहे.

 

त्यांच्या शिरपूर भेटीप्रसंगी छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून त्यांना यशवंत निकवाडे लिखीत पुस्तक “जगण्याची संजीवनी” हे भेट देऊन गौरव केला.

 

या प्रसंगी राष्ट्रीय मानवाधिकार जनसेवा ट्रस्टचे धुळे जिल्हाध्यक्ष आदरणीय रामचंद्र येशील,जन कल्याण सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विकास सेन,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मनोहर पाटील हे मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here