दोंडाईचा (संतोष कोळी) – रविवार दि.२२ नोव्हेंबर २०२० रोजी दादासाहेब रावल स्टेडियम दोंडाईचा येथे टोकरे कोळी वधु वर सूचक केंद्र द्वारे बैठक घेण्यात आली.या वेळी कोळी समाजाच्या संघटनांचेपदाधिकारी, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी वधू वर परिचय या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलेल्या या वेळी उपस्थित बैठक झाली.
आदिवासी टोकरे कोळी समाजाचे वधू वर सूचक मंडळ धुळे नंदुरबार. वधु-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात यावं म्हणून पुढील वर्षी होणाऱ्या दि. २१ फेब्रुवारी २०२१ रविवार रोजी(ठिकाण शिंदखेडा) आदिवासी टोकरे कोळी समाजाचे वधु वर सुचक मंडळा मार्फत मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात जास्तीत जास्त समाज बांधव ,वधू वर, यांनी उपस्थित राहण्याच्या संकल्प करण्यात आला.
या मेळाव्यासाठी सर्व समाज बांधव एकत्र येऊन मोठया संख्येने उपस्थित होती.मागील परिचय मेळाव्याचे अनुभवी पदाधिकारी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.प्रत्यक्ष प्रचिती आजच्या बैठकीमध्ये पाहण्यास मिळाली. सुरेश कुवर यांनी समाज बांधवांना उद्देशून सांगितले की सर्व क्षेत्रातील कुठलेही पक्ष व संघटनेच्या भेदभाव न करताआजच्या बैठकीत समाज एकीकरण व आपला सहभाग व्हावा असे त्यांनी सांगितले
यावेळी उपस्थित मान्यवर आदिवासी टोकरे कोळी वधुवर सुचक केंद्र(१ते१०व्हॉट्सअॅप ग्रुप) अध्यक्ष रवी शिरसाठ, शानाभाऊ सोनवणे, संतोष कोळी (पत्रकार), सुरेश कूवर कैलास ईशी, नरेंद्र कोळी नगरसेवक, मनोज निकम, हिरालाल ठाकरे, अशोक बागुल, सचिन मगरे, नितीन सावळे , वसंत कोळी, छोटू सैंदाणे, संजय कोळी, सतीश ईशी, आप्पा कोळी, अनिल जाधव, अशोक बागुल, दिलीप सोनवणे , मयूर कोळी, मनोज ठाकरे, कृष्णा कोळी,सागर कोळी, बंटी कोळी, सागर निकुंबे, संदीप चव्हाण हेमराज बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश सोनवणे केले तर आभार बागुल यांनी मानले.




