दोंडाईचा (प्रतिनिधी संतोष कोळी) – जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिनानिमित्त आज दोंडाईचा शहरातील सामाजिक संस्था रोटरी सिनियर्स , इनरव्हील दोंडाईचा , आर सी.सी .राऊंडटाऊन व जनसहयोग रोटी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील दिव्यांग गरजुंना कपडे व अन्नदान करण्यात आले तसेच दोंडाईचा शहरातील जेष्ठ श्री गंगाराम सुकलाल शिंदे यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त मिठाईचे वाटप करण्यात आले तसेच गोपाल हाँटेल ,विजय हाँटेल ,भाऊ हाँटेल इ व्यवसायीकांनी अन्नदानात सहभाग नोंदवला .
रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया यांनी सांगितले की जनसहयोग रोटी बँकेचे कार्य अतुलनीय आहे दररोज ४ वाजता शहरातील गरजु अपंग हुसेनभाईंची आतुरतेने वाट बघत असतात शहरातील सर्व सामाजिक कार्यात आवड असणारे व्यक्तींनी आपला वाढदिवस रोटी बँकेतच साजरा करुन गरजुंना मदत करावी असे आवाहन केले
याप्रसंगी रोटरीचे प्रविण महाजन ,जनसहयोग रोटी बँकेचे हुसेनभाई विरदेलवाला ,भाजपाचे दिव्यांग आघाडीचे तालुकाध्यक्ष वसंत बागल ,इनरव्हीलच्या अध्यक्षा सौ मयुरा पारख ,सौ मुनिरा विरदेलवाला ,बी जी शिंदे सर , महेंद्र शिंदे ,सुरेश इंगळे इ मान्यवर उपस्थित होते.




