- नंबर प्लेट, रेडीयम व तत्सम गँरेज व्यवसायात वाढ
दोडाईचा (विशेष प्रतिनिधी) – येथे मागील आठवड्यात दोडांईचा पोलीसांना एका शिताफीने चोरी झालेल्या मोटरसायकल व्यवहारातुन हाती आलेल्या एका आँनलाईन चोरावरून ससेमिरा लावत,गावातील संशियत म्हणून अनेकांना मोटरसायकली सह ताब्यात घेत,जवळपास पस्तीस चोरी झालेल्या मोटरसायकली मिळवत ,मोटरसायकल चोरीच्या घटनावर अंकुश मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून ह्या कामाचे श्रेय निश्चितच दोंडाईचा पोलीस स्टेशनला लाभलेले प्रोबेशनरी एसपी. श्री पंकजजी कुमावत यांना जाते.याबाबत त्यांनी नागरिकांना आपल्या मोटरसायकल ओळखीचे आवाहन करत ,कायदेशीर मार्गाने मोटरसायकली ताब्यात घेण्याचे आवाहन केले आहे. म्हणून त्यांच्या ह्या धडाकेबाज कार्यवाहीचे गावात सर्वत्र कौतुक केले जात असुन,त्यामुळे प्रत्येक नागरिक गावात वावरतांना आपल्या मोटरसायकलीची कागदपत्रासह चांगलीच काळजी घेत,गँरेज रिपेरिंग, नंबर प्लेट, रेडीयमच्या लहान व्यवसायात तेजी आल्याने गँरेज दुकानदारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
दोंडाईचा म्हटले म्हणजे येथे सर्वगुण संपन्न व्यक्ती आहेत. येथील प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात, व्यवसायात वरपर्यंत झेंडा गाडण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. मग ते क्षेत्र म्हणजे राजकीय, सामाजिक,सांस्कुतीक, उद्योगीक, बँकींग, मिरची व्यापार, गुल्कोज, शेतकरी न्यायहक्क,तलवारबाजी, मारामारी, खुन आदी व्ययसायात आजपर्यंत गाजवलेले आहे. त्यात मागील काही वर्षापासून गावात मोटरसायकली चोरींचे प्रमाण खुप वाढत जात होते. म्हणजे एकवेळा घरापासून, दुकानापासुन,गावातुन चोरी झालेली मोटरसायकल कधी तपासातुन (एखाद अपवाद सोडला तर) मुळ मालकाला परत मिळत नव्हती. म्हणून आलेले, लाभलेले अधिकारीही मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यास फारसे धजावत नव्हते व ज्याची मोटरसायकल चोरीला गेली. तो ही पोलीस स्टेशनच्या प्रक्रीया पार पाडत, गुन्हा दाखल करण्यास स्वारस्य दाखवत नव्हता. म्हणून गावात चोरांचे चांगलेच फावत होते.चुकून एखादा चोरीच्या मोटरसायकल सोबत सापडला, मध्यस्थी मार्फत मिळाला तर वरवरच सर्व मामला रफा-दफा व्हायचा. म्हणून मोटरसायकल चोरी तपासबाबत पोलीसांकडून होत असलेली अंध,अक्ष्यम चुक नेहमी तळतळलेल्या नागरिकांचे लक्ष ठरायचे.कारण ह्या गावात लाभलेला कोणताही अधिकारी चोरीच्या घटनेच्या तळापर्यंत जाण्याची हिम्मंतच करायचा नाही. गावातील व्हाईट अँन्ड बँल्क काँलर लोकांचे (एखाद्या अधिकारी अपवाद वगळता) अनेकवेळा वर्चस्व दिसायचे. म्हणून तेही गुपचूप जैसै -थै वेळ मारत आपला कार्यकाळ काढायचे,पुर्ण करत पळायचे. म्हणून ह्या आदीही हाती आलेल्या एका सुईवरून तपासाच्या अनेक संधी चालून आल्या असतील. पण जनताभिमुख तक्रारी व कर्तव्याप्रती फारशी जाणीव, जागरूकता त्यांच्या कामातुन दिसून आली नाही.
मात्र आता कैलासवासी मोहन मरठे प्रकरणापासुन दोंडाईचा पोलीस स्टेशनला जिल्हा लेवलचे प्रोबेशनरी एसपी. पंकज कुमावत लाभलेले आहेत. म्हणून गावात पोलीसांविषयी ढासळलेली प्रतिमा कशी उंचावता येईल व येथील जनतेच्या गरजा, समस्या काय आहेत, हे जाणून घेत. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरु आहे. म्हणून मागील आठवड्यात रामी येथील मोटरसायकल चोरीला गेल्यावर, चोरांनी मुळ गाडी मालकाला त्याची गाडी परत करण्यासाठी आँनलाईन फोन पे ने पैसे टाकण्याचे सांगितले. म्हणून प्रो.एसपी श्री कुमावत यांनी ह्या घटनेवर लक्ष केन्द्रीत करत,तळापर्यंत जात. घटनेशी निगडीत जो मिळेल,तो हाती घेत,पूर्ण गाव रात्र-पहाटे पिंजून काढले व मोटरसायकल चोरी करणारे व चोरीच्या मोटरसायकल घेणाऱ्या-देणाऱ्यांमध्ये दहशत करून टाकली.म्हणून ह्या गुपीत मोहीमेत आजपर्यंत त्यांच्या हाती पस्तीस मोटरसायकली चोरी झालेल्या लागलेल्या आहेत. याबाबत त्यांनी जनतेला आपल्या चोरीला गेलेल्या मोटरसायकल ओळखीसाठी आवाहन केले आहे व कायदेशीर मार्गाने न्यायालयातुन घेऊन जायचे आवाहन केले आहे.
गावात प्रोबेशनरी एसपी श्री कुमावत यांच्याकडून मोटरसायकल चोरी संदर्भात राबवण्यात आलेल्या मोहीमेत तब्बल चोरी झालेल्या पस्तीस मोटरसायकल मिळून आल्याने तरूण मंडळीसह जनतेकडून त्यांच्या ह्या धडाकेबाज कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. जेथे जावे तेथे, चौका- चौकात तरूणांकडून त्यांच्या मोटरसायकल व अवैध धंदे बंद करण्याविषयी कार्यवाहीचे कौतुक केले जात आहे. आज गावातील व गावात येणार-जाणारे प्रत्येक नागरिक आपली मोटरसायकल व तीचे कागदपत्रे सोबत ठेवत,बरोबर आहेत की नाही, ह्याची काळजी घेत आहे. तसेच मोटरसायकल मध्ये काही कमतरता म्हणजे नंबर प्लेट इतर काही असल्यास वेळेवर पुर्ण करून घेत आहे. म्हणून संबंधित नंबर प्लेट व गँरेज व्यवसाय करणाऱ्या लहान दुकानदांरामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
जनतेने खालील दिलेल्या छायाकींत प्रतीत -दोंडाईचा पोलीस स्टेशनला चोरी होऊन तपासात हस्तगत केलेल्या मोटरसायकलचे वर्णन, नंबर प्लेट, चेचीस नंबर, इंजिन नंबर दिलेला आहे, म्हणून ओळखीचे आवाहन केले आहे.




