विविध मान्यवरांच्या उपस्थितीसह,शेकडो भक्तांनी घेतला किर्तनाचा लाभ
दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – जयदिप नॉलेज कॅम्प, देगाव ता.शिदंखेडा येथे स्वर्गीय आईसाहेब मिनाताई गिरासे यांचा स्मारकाचा लोकार्पण सोहळा व ह.प.भ.जनार्दन महाराज आरावेकर यांचा जाहीर किर्तनाचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या हस्ते नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न करण्यात आला.

यावेळी देगाँव ता.शिदंखेडा येथे आयोजित केलेल्या कार्यकर्मात खासदार श्री. सुभाषजी भामरे मा.केंद्रीय मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितित स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. सोबत भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, महाराष्ट्र ऊर्जा विभागाचे मा. संचालक गुलाबसिंग गिरासे, कैम्पसचे आधारस्तंभ रजेसिंग गिरासे सर, ह भ प ओंकारसिंग बापू गिरासे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे, हस्ती बॅकेंचे चेअरमन कैलास जैन, माजी नगराध्यक्ष बापूसाहेब रविंद्र देशमुख,कार्यक्रमाचे आयोजक जयदिप कैम्पसचे चेअरमन दिपक गिरासे, प्रधानमंत्री कार्यालयिन सदस्य हेमंत पवार , भाजपा संघटक डी. एस. गिरासे, जि प सदस्य विरेंद्रसिंह गिरासे, व्हीजुलैन्स अधिकारी कोकणचे सतीश गिरासे, प. स. सदस्य रणजीतसिंग गिरासे, इलेक्ट्रिकल इंसपेक्टर राहुल गिरासे, सुरतचे मा नगरसेवक शशिधर देसले ,मेथी सरपंच रमाकांत बागले, तसेच आयोजकाँवर प्रेम करणारे गावातील परिसरातील आलेले सर्वच राजकीय सामाजिक मंडळी मोठ्यासंखेने उपस्थित होते.
त्यानंतर पुढील कीर्तनाचा कार्यक्रम ह. भ. प. श्री जनार्दन महाराज यांनी अतिशय सुंदर व मधुर आवाजातुन आई विषयी गाणी गायली. यावेळी किर्तन ऐकण्यासाठी गाव व परिसरातील महिला व पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटपर्यंत संपूर्ण कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. प्रतिमा किशनगढ राजस्थान येथून बनवून आणली सुंदर स्मारकाने मिनाताई शैक्षणिक संकुल देगाव हे अतिशय प्रसन्न वाटत होते. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयदिप नाँलेज कँम्पचे सर्वच कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.




