उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचातर्फे भव्य रक्तदान शिबिर

dondaicha-blood-donatation

दोंडाईचा (प्रतिनिधी संतोष कोळी) – येथील दि.३०/१२/२०२० रोजी उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा तर्फे, भव्य रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. यात, दोंडाईचा, नगरपालिका व तहसील कार्यालय यांच्या सहकार्याने, दोंडाईचा त्याबरोबर परिसरातील व नामांकित एकूण १०३ लोकांनी पैकी पत्रकार संतोष कोळी ॲडवोकेट संतोष भोई यांनी रक्तदान केले.

या प्रसंगी, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललितकुमार चन्द्रे, दोंडाईचा शहराचे अप्पर तहसीलदार सुदाम महाजन, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, उपमुख्याधिकारी हर्षल भामरे, डॉ. हितेंद्र देशमुख, शासकीय भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथील, डॉ. मेघा अडचीत्रे , नगरसेवक हितेंद्र महाले नरेंद्र गिरासे जितेंद्र गिरासे दोंडाईचा मराठी पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष राघो कोळी, दोंडाईचा न्यायालयाचे अँड संतोष भोई, अँड बबलू रॉय , अखिल भारतीय कोळी समाजाचे कार्यकर्ता हिरालाल सावळे ,यावेळी सर्व दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उज्ज्वला मोरे, योगेश पवार, हेमा पवार, विजय पाटील, धीरज डोळे, सलमान खान, गजेन्द्र नेरपगार, अमृत माळी , कमलेश ठाकूर, हे उपस्थित होते.

याप्रसंगी तमाम जनतेसाठी डॉ. ललितकुमार चन्द्रे यांनी, “रक्तदान हे श्रेष्ठदान” आहे, असे संबोधित रक्तदान करण्यास कोणीही न घाबरता, येणाऱ्या काळात, सर्वांनी रक्तदान करावे. रक्तदान केल्याने आज पर्यंत कुठलाही , काहीही त्रास झालेला नाही किवा होत नाहीं, असे विनम्र आवाहन केलें. शिबिर संपल्यावर त्यांनी तहसील विभाग नगरपालिका, सर्व नगरसेवक, सर्व पत्रकार,व रक्तदात्यांचे उपस्थितांचे आभार दोंडाईच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ललितकुमार चद्रे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here