राज्य शासनाच्या माझी वंसुधरा अभियानात, दोंडाईचा नगरपालीकेचा प्रत्यक्ष सहभाग….

mazi-vasundhara-abhiyan

शहर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी,एक जानेवारीपासून दोंडाईचा नगरपालिका कर्मचाऱ्यांची हरित शपथ…

दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्यातील सर्व शहरे स्वच्छ, सुंदर व हरित व्हावी. तसेच पर्यावरणाचा समतोल राखता यावा. म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये. यासाठी राज्य शासनाने शासन निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर २०२० अन्वये माझी वसुंधरा अभियानाची घोषणा केलेली आहे. यात निसर्गाच्या पंचातत्वावर आधारित जल,वायू,आकाश, पृथ्वी व अग्नी यावर आधारित अभियान आहे. यात एकूण पंधराशे गुणांची स्पर्धा ठेवण्यात आली असून त्याची पाहणी शासनामार्फत मार्च २०२१ मधे होणार आहे.सदर अभियानात दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद प्रत्यक्ष सहभागी झाली आहे. यासाठी नुकतेच सर्व कर्मचारी यांनी शहर स्वच्छ, सुंदर करण्यासाठी हरित शपथ घेतली आहे.

 

dondaicha-mazi-vasundhara-abhiyan

गावात माझी वंसुधरा अभियान अंतर्गत विविध घटकांचे आधारे अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हया अभियान अंतर्गत नगरपरिषदेमार्फत पुढील काळात अनेक प्रकारच्या कडक कार्यवाही,उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यात पृथ्वी या तत्वाशी संबंधीत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरात शंभर टक्के घनकचऱ्याचे जागीच विलगीकरन करुन शंभर टक्के कचरा संकलनावर नगरपरिषदेचा भर असणार आहे. तसेच वनीकरण,वनसंवर्धन,सांडपाणी व्यवस्थापन इत्यादी बाबींवर कार्य करण्यात येणार आहे. वायु हया तत्वाचे संरक्षण करता यावे. हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदुषण कमी करुन हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे वर भर देण्यात येणार आहे. जल तत्वाशी संबंधीत नदी संवर्धन बाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. अग्नी या तत्वाशी संबंधीत ऊर्जेचा परिणामकारक वापर ,ऊर्जा बचत तसेच ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींवर भर देण्यात येणार आहे. आकाश या तत्वास स्थळ व प्रकाश या स्वरुपात निश्चित करुन मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती करण्यात येणार आहे.

 

dondaicha-shapath

म्हणून याचाच एका भाग म्हणून शहर स्वच्छ व सुंदर2 दिसण्यासाठी नवीन वर्षाच्या दिवशी म्हणजे एक जानेवारी रोजी नगरपालीका कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे उपस्थितीत हरित शपथ(E pledge) घेण्यात आली. तसेच शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. वरील कार्यक्रम आमदार तथा माजी मंत्री जयकुमारभाऊ रावल यांचे मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा आईंसो नयनकुवरताई रावल यांचे अध्यक्षतेखाली तसेच आरोग्य सभापती प्रतिनिधी जितेंद्र गिरासे सर,,मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम, उप-मुख्याधिकारी हर्षल भामरे ,कार्यालय अधिक्षक गजेंद्र सावरे,अभियंता जगदीश पाटील, शिवनंदन राजपूत, प्रकाश जावरे, सत्यम पाटील, हर्षल ढवळे, आरोग्य निरीक्षक शरद महाजन, उद्यान पर्यवेक्षक महेंद्र शिंदे तसेच सर्व अधिकारी कर्मचारी दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद यांचे उपस्थितीत हरित शपथचा कार्यक्रम पार पडला.तसेच यावेळी आरोग्य सभापती पती जितेंद्र गिरासेसर यांनी मनोगत व्यक्त केले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here