माझी वसुंधरा अभियान अंतर्गत दोंडाईचा शहरात राजेरोसपणे प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्या दुकानदांरावर नपाची कडक कारवाई

plastic-of-dondaicha
  • तीन व्यापाऱ्यांकडुन पंधरा हजारांचा दंड वसुल,गावात इतर भुरट्या विक्रेत्यांची अजुनही विक्री सुरू
  • प्लास्टिक पिशव्यांवर कायमस्वरूपी बंदी आणण्याची मागणी…

दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – पर्यावरणाला घातक असलेल्या पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर महाराष्ट्रात शासन निर्णय क्र. स्वमअ २०१७/ प्र.क्र.२५६(१) नवि३४ नगरविकास विभाग,महाराष्ट्र शासन दि.०७/सप्टेबंर २०१८ अन्वये बंदी करण्यात आलेली आहे.

तसेच अश्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापर व विक्री करण्याऱ्या व्यापऱ्यांना नगरपरिषदेमार्फत वेळोवेळी सुचना व दंड देण्यात आलेला होता. परंतु तरी देखील दोंडाईचा शहरात राजेरोसपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर व विक्री होत असल्याचे नगरपरिषदेच्या निदर्शनास आले आहे. शासनाने प्लास्टिक विरोधी धोरण अवलंबिले असले तरी पर्यावरणाचा विचार न करता बरेच छोटे-मोठे व्यापारी प्लास्टिक कॅरी बॅग,इतर प्लास्टिक साहित्य विक्री व वापर करतात. म्हणुन मंगळवारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.प्रविण निकम, स्वच्छता निरीक्षक शरद महाजन व पालिका कर्मचारी यांनी दोंडाईचा शहरातील विविध दुकानांवर अचानक, गावात माझी वंसुधरा अभियान राबवण्या अंतर्गत धाडी टाकल्या असता, त्यात शहरातील संकेत प्लास्टिक स्टोअर्स , कौशल्या मार्केटिंग व राजलक्ष्मी ट्रेडिंग या दुकानांवर प्लास्टिक पिशव्या आढळुन आल्या. म्हणून पालीकेने दुकानदारांवर दंडात्मक कार्यवाही करत प्रत्येकी पाचहजार रुपये प्रमाणे दंड आकारून, असा एकुण टोटल पंधराहजार रुपये इतका दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच या कार्यवाहीत एकुण एकशे पंच्याहत्तर किलो प्लास्टिक नगरपरिषदेमार्फत जप्त करण्यात आले आहे.

dondaicha-plastic-bag

तसेच पुढील काळातही शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर व विक्री करणा-या व्यापारी व किरकोळ विक्रेते,नागरीकांवर नगरपरिषदेमार्फत दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे मुख्याधिकारी डॉ.प्रविण निकम यांनी सांगितले. शहरात मागील दोन ते तीन वर्षापासून राजेरोसपणे प्लास्टिक पिशव्या व तत्सम बंदी करण्यात आलेल्या वस्तुची विक्री वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे विक्री सुरू असते.म्हणून अशी ही विक्री गावातील टँक्स भरणाऱ्या व वेळेवर न भरणाऱ्या लोकांच्या आरोग्यास हानीकारक आहे. म्हणून वेळेवर जनतेकडून टँक्सची अपेक्षा करणाऱ्या नगरपालीकेने जनतेच्या आरोग्याचा दुष्टीनेही विचार करून नुसते पगारावर आँफीसमध्ये न बसता अशा भुरट्या विक्रेत्यांवरही वेळोवेळी पाळत ठेवून कडक कार्यवाही करायला हवी, अशी अपेक्षा गावातील टँक्स भरणारी, व आरोग्य हित जोपासणारी नागरीक करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here