महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगाना मिळनार ३५ किलो धान्य – पी.एम.पाटील.सर

p-m-patil-sir-dharangaon

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगांव येथे महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचा अध्यक्षतेखाली मागील महीन्यात दिव्यांगांचा मेंळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात प्रत्येक दिव्यागांना ३५ किलो धान्य मिळावे. त्यांना अंत्योदय योजनेचे रेशन कार्ड मिळावे अशी मागणी करण्यात आली होती.

पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटिल यानी तात्काळ सर्व दिव्यांगना अंत्योदय योजने अंतर्गत ३५किलो धान्य दिले जाईल असे आश्वासन दिले होते. त्या नुसार अन्य नागरी पुरवठा मंत्री ना.छगनराव भुजबळ यांनी तसा जी आर काढ़ला आहे.सर्व दिव्यांगाना ३५ किलो धान्य मिळनार असून, आमच्या लढ़याला यश मिळाले असल्याचे महाराष्ट्र दिव्यांग विकास महासंघाचे अध्यक्ष पी.एम.पाटील.सर यांनी सांगितले दिव्यांगांप्रती हा महत्वाचा निर्णय तात्काळ घेतल्याबद्दल त्यांनी महाविकास आघाड़ी सरकारचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here